• Home
  • पुण्यात कॉलेजमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या ✍️ धायरी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुण्यात कॉलेजमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या ✍️ धायरी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

🛑 पुण्यात कॉलेजमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या 🛑
✍️ धायरी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

धायरी (पुणे ):⭕सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात 26 वर्षीय तरुणीने घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर प्रकार आज शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास उघडीस आला. माधुरी तानाजी जगदाळे (वय: 26 वर्षे, रा. गणेशनगर, धायरी, ता. हवेली जि. पुणे) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.
दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान तिचा भाऊ व तीने एकत्र मिळून जेवण केले. त्यानंतर तिने भावास मी आराम करते, तू बाहेरून कुलूप लावून जा असे सांगितले. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तिची आई कामावरून आल्यानंतर त्यांनी कुलूप काढून दरवाजा उघडल्यानंतर बेडरूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे आढळून आले.
कुटुंबीयांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता तिचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहे…⭕

anews Banner

Leave A Comment