Home Breaking News बहुजनांच्या वाघाची १०० गाड्यांसह एण्ट्री! प्रतिमेला दुग्धाभिषेक केला.. ✍️सांगली ( विजय पवार...

बहुजनांच्या वाघाची १०० गाड्यांसह एण्ट्री! प्रतिमेला दुग्धाभिषेक केला.. ✍️सांगली ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

72
0

🛑 बहुजनांच्या वाघाची १०० गाड्यांसह एण्ट्री! प्रतिमेला दुग्धाभिषेक केला..🛑
✍️सांगली ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सांगली :⭕ शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. शरद पवार धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी सकारात्मक नसून फक्त राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं माझं मत आहे. गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्राचं नेतृत्त्व ते करत आहेत. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. ती ते पुढंही चालू ठेवतील.
शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेनंतर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. ठिकठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांचं कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जात आहे. इतकंच नाही तर पंढरपुरात गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालण्यात आला. तर सांगलीत 100 गाड्यांच्या ताफ्यासह पडळकरांची ‘ग्रँड एण्ट्री’ झाली.

धनगर समाजाकडून पडाळकर यांच्या समर्थनार्थ चंद्रभागेच्या वाळवंटात दुग्धाभिषेक करण्यात आला. गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दूध आणि चंद्रभागेच्या पाण्याने अभिषेक घालून त्यांना पाठिंबा दर्शवण्यात आला. पडळकर यांच्या विधानावर आंदोलन करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे भ्रष्ट हात आमच्या नेत्यांच्या प्रतिमेला लागल्याने, प्रतिमेला अभिषेक घालून शुद्ध केले, असं यावेळी पडळकर समर्थकांनी नमूद केलं. पडळकरांच्या समर्थनात एकच छंद गोपीचंद, अशा घोषणाही कार्यकर्त्यांनी दिल्या. सांगलीमध्ये देखील गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुधाने अभिषेक घालण्यात आला आहे…⭕

Previous articleराज ठाकरे यांच्या घरीपोहोचला करोना ✍️ मुंबई ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )
Next articleपुण्यात कॉलेजमध्ये काम करणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने केली आत्महत्या ✍️ धायरी ( विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here