• Home
  • 🛑महापालिकेतील वरीष्ठ अधिकारी घरी पार्टी करतात! मला चटके देतात ✍️ अहमदनगर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

🛑महापालिकेतील वरीष्ठ अधिकारी घरी पार्टी करतात! मला चटके देतात ✍️ अहमदनगर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज

🛑महापालिकेतील वरीष्ठ अधिकारी घरी पार्टी करतात! मला चटके देतात 🛑
✍️ अहमदनगर ( विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

अहमदनगर -⭕ महापालिकेतील दोन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह इतर तीन ते चारजण रात्री घरी येऊन दारूची पार्टी करतात, धिंगाणा घालतात व मला मारहाण करून चटके देतात, अशी तक्रार शहरातील एका नर्सच्या अल्पवयीन मुलाने पोलिसांकडे केली आहे. तक्रार करणार्‍या मुलाने गुरुवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकांकडे व्यथा मांडली. यावेळी त्याच्या समवेत त्याची आजी व इतर नातेवाईक होते.

अल्पवयीन मुलाच्या तक्रारीची गांभिर्याने दखल घेत स्थानिक गुन्हे शाखेने महापालिकेतील त्या दोन अधिकार्‍यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलवून घेतले होते. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी हे प्रकरण पुढील कारवाईसाठी बालकल्याण समितीकडे पाठविले आहे.
तक्रारदार मुलाची आई नर्स असून त्याच्या वडिलांचे अडिच वर्षापूर्वी निधन झाले आहे.

त्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाल्यापासून महापालिकेतील दोन जबाबदार अधिकारी व त्यांचे तीन ते चार मित्र रात्री-अपरात्री घरी येऊन दारूची पार्टी करतात. धिंगाणा घालतात आणि मला वारंवार मारहाण करतात. पाच दिवसांपूर्वी चार जण माझ्या घरात धिंगाणा घालत होते. मी त्यांना धिंगाणा घालू नका, असे म्हटल्यानंतर चार जणांपैकी एका अधिकार्‍याने मला बूट फेकून मारला व माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तसेच, त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांनी मला मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. गच्चीवरून खाली टाकण्याचा प्रयत्न केला.

दुसर्‍या दिवशी हा प्रकार मी माझ्या आजीला सांगितला. यानंतर आम्ही फिर्याद देण्यासाठी तोफखाना पोलीस ठाण्यात गेलो होतो. मात्र, तेथे फिर्याद दाखल झाली नाही, अशी व्यथा मुलाने लेखी आणि तोंडी स्वरूपात पोलिसांकडे मांडली. तक्रार करणारा मुलगा अल्पवयीन असल्याने हे प्रकरण महिला-बालकल्याण समितीकडे पाठविण्यात आले आहे…⭕

anews Banner

Leave A Comment