Home जळगाव अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाध्यक्षपदी खांदेशच्या डॉ सौ साधना निकम यांची सार्थ...

अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाध्यक्षपदी खांदेशच्या डॉ सौ साधना निकम यांची सार्थ निवड

90
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_071201.jpg

अखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाध्यक्षपदी खांदेशच्या
डॉ सौ साधना निकम यांची सार्थ निवड
.. चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील ………………………………………..
अंकुर साहित्य संघ महाराष्ट्र मुख्यालय – अकोला आयोजित
६१ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन अकोला येथे दिनांक २३ व २४ डिसेंबर २०२३ रोजी संपन्न होत आहे. त्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून चाळीसगावच्या रहिवाशी प्राचार्य डॉ सौ साधना शामकांत निकम यांची निवड झाली आहे. खान्देशचा अभिमान आणि बहुमान खऱ्या अर्थाने वाढला आहे .या कार्यक्रमाचे उद्घाटक प्रा. डॉक्टर संतोषजी हुसे असून स्वागताध्यक्ष प्रा.ललितजी काळपांडे राहणार आहेत. या निवडीबद्दल केंद्रीय अध्यक्ष तथा हास्य कवी हिम्मतजी ढाळे , तुळशिरामजी बोबडे आणि केंद्रीय कार्यकारिणीने त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून चाळीसगावचे प्रथितयश डॉ. विनोद कोतकर उपस्थित राहणार आहेत. दिनांक २३ डिसेंबर २०२३ रोजी प्रथम दिवशी उद्घाटन सोहळा, पुस्तक प्रकाशन, अंकुर वाडमय पुरस्कार वितरण, परिसंवाद , निमंत्रितांचे कवी संमेलन आणि रात्री उपस्थितांचे कवी संमेलन होणार आहे.परिसंवादात चाळीसगावचे पर्यावरण मित्र शालिग्राम निकम सर सहभागी होतील. या संमेलनासाठी चाळीसगावातील नामांकित कवी रमेश पोतदार , प्रा.शामकांत निकम, विनोद पिंगळे ,लालचंद गायकवाड,बी एम मालपुरे ,सोमेश्वर कासार ,मंगला कुमावत ,सुरेखा गुरव, मनीषा वाणी, निर्मला पवार व गणेश निकम इत्यादी कवी सहभागी होतील .दि २४ डिसेंबर२०२३ रोजी गजल मुशायरा होईल त्यात चाळीसगावचे प्राचार्य शिवाजीराव साळुंखे सहभागी होणार आहेत .तदनंतर महिला कवी संमेलन होईल . कथाकथन प्रकारात चाळीस गावचे कवी सुनील गायकवाड सहभागी होतील . सायंकाळी या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. सर्व साहित्यीक, कवींना स्मृतिचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येईल . तरी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व साहित्य रसिकांनी आपला आनंद द्विगुणीत करण्यासाठी अकोला येथे उपस्थित रहावे असे जिल्हाध्यक्ष शालिग्राम निकम ,जिल्हा सचिव रमेश पोतदार व कार्याध्यक्ष प्रा. शामकांत निकम कळवितात.

Previous articleजिल्हाधिकारी जळगाव यांचे हस्ते ‘किमया गृपचा ‘ यथोचित सन्मान
Next articleकेंद्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम :- इंजि.प्रमोदजी पिपरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here