Home गडचिरोली केंद्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम :- इंजि.प्रमोदजी पिपरे

केंद्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम :- इंजि.प्रमोदजी पिपरे

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20231218_071538.jpg

केंद्र व राज्यसरकारच्या कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून महिला सक्षम :- इंजि.प्रमोदजी पिपरे

मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत व समाजकल्याण विभाग व दिअंओ-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विध्यमाने उपक्रम.

नगर परिषद गडचिरोली यांच्या वतीने इंदिरानगर येथे भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ):- 

महिलांसाठी मा. पंतप्रधान मोदिजीनी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विविध योजनांतून तसेच बचतगटाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे व देत आहेत. महिलांनी या योजनांचा लाभ घेतला तर निश्चितच त्यांचा अर्थिक स्तर उंचावून त्या सक्षम होतील.असे प्रतिपादन लोकसभा समन्वयक इंजि.प्रमोदजी पिपरे
यांनी केले.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत व समाजकल्याण विभाग व दिअंओ-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विध्यमाने नगर परिषद गडचिरोली यांच्या वतीने भव्य महिला शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमाचे इंदिरानगर येथील नप प्राथ.शाळा जवळील खुल्या आवारात आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी स्थानावरून प्रमोदजी पिपरे बोलत होते.
महात्मा ज्योतीराव फुले जन धन आरोग्य योजना,आयुष्यमान भारत योजना गोल्डन कार्डचे वाटप,मुख्यमंत्री रोजगार निर्मिती,राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान,केंद्र शासन सहाय्यित योजना,महाआरोग्य शिबीर,कृषी चिकित्सालय,हत्तीरोग अभियान,पोस्ट ऑफिस,बँकऑफ इंडिया खाते उघडणे अशा ईतरही विविध शासकीय योजना विषयी माहितीचे स्टॉल लावण्यात आले होते.
याप्रसंगी पंतप्रधान आवास योजनांचे चेक,प्रधानमंत्री स्वनिधी योजनांचे चेक व मंजूर पत्र मा.सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे,मुख्यकार्यकारी अधिकारी सुर्यकांत पिदुरकर,माजी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,माजी नप सभापती केशव निबोड,माजी नगरसेविका लताताई लाटकर,माजी नगरसेविका बेबीताई चिचघरे,उप मुख्याकार्याकारी अधिकारी रवींद्र भांडारवार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र मुरमुरवार तसेच मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र सोनवाने,सूर्यकांत मडावी यांनी केले.

Previous articleअखिल भारतीय अंकुर साहित्य संमेलनाध्यक्षपदी खांदेशच्या डॉ सौ साधना निकम यांची सार्थ निवड
Next articleसंभाजीनगरच्या रंगमंचावर गाजली “”नजर””
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here