Home विदर्भ छत्तिसगढ:५ लाखांचे बक्षिस असलेल्या नक्षली कंमाडर ठार,मोठा शस्ञसाठा जप्त नक्षल व पोलिस...

छत्तिसगढ:५ लाखांचे बक्षिस असलेल्या नक्षली कंमाडर ठार,मोठा शस्ञसाठा जप्त नक्षल व पोलिस चकमक

128
0

राजेंद्र पाटील राऊत

छत्तिसगढ:५ लाखांचे बक्षिस असलेल्या नक्षली कंमाडर ठार,मोठा शस्ञसाठा जप्त नक्षल व पोलिस चकमक     दंतेवाड़ा: ( सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- छतीसगढ मधील दंतेवाड़ा येथे पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली.काल शुक्रवारी झालेल्या या चकमकित नक्षली कंमाडर ठार झाला आहे,ठार झालेल्या या नक्षलवादी कंमाडर वर ५ लाखांचे बक्षिस पोलिस खात्यांकडून ठेवण्यात आले होते,पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात ठार झालेल्या या कंमाडर नक्षल्याचे नाव रामसु असल्याची माहिती समोर आली आहे.या चंकमकी नंतर पोलिसांनी सांगितले कि , ठार झालेल्या नक्षलवाद्याची ओळख पटली आहे,त्याचे नाव रामसु असे आहे,तो प्लाटुन नं.१६ च्या सेक्शन चा कंमाडर होता,इंदिरावती एरिया कमिटिच्यां नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाला आहे. या चकमकी नंतर पोलिसांनी संपुर्ण परिसरात शोधमोहीम राबवली, यावेळी पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्ञसाठा आढळुन आला.ज्यामध्ये पिस्तुल , ५ किलो बॉम्ब,वायर आणि इतर साहित्याचा समावेश होता,पोलिस अधिक्षक डॉ.अभिषेक पल्लव यांनी या वृताला दुजोरा दिला आहे,मिळालेल्या माहीती नुसार ,इंद्रावती नदीच्या पलिकडे नंक्षलवाद्यांचा वावर असल्याची माहीती पोलिंसाना खब-यांकडून मिळाली होती.या परिसरात अनेक कुख्खात नक्षलवादी उपस्थिती असल्याची माहीती मिळाली होती,या माहीतीच्या आधारे शुक्रवारी पोलिंसाची टिम दाखल झाले यावेळी नक्षलंवादी पोलिसांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.त्या नंतर पोलिसांनी ही स्वसंरक्षणार्थ नक्षलवाद्यांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले. नक्षलवाद्यांच्या गोळिबार सुरु असतांना पोलिसांनी प्रत्युतर या सोबतच पोलिसांना नक्षलवादी घेरले ,दोन्हीं बाजुनी बराच वेळ गोळीबार सुरु होता,मिळालेल्या माहिती नुसार, पोलिस नक्षलवादी यांच्यात जवळपास अर्धा तास गोळिबार सुरु होता,या चकमकीत एका नक्षलवादी कंमाडर चा खात्मा झाला आहे.या चकमकी नंतर पोलिसांनी परिसरा ची झडती घेतली, त्यावेळी तेथे पिस्तुल आयईडी सह इतर शस्ञसाठा आढळुन आला,पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहीती नुसार २ नोव्हेबंरला दिवाळी पुवी नक्षलवांद्याच्या सुरू असलेल्या कारवाया रोखण्यासाठी सुरक्षा दलाचे जवान निघाले होते,यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी नक्षलवाद्यांना आयईडि ठेवत असतांना पाहीले ,त्यानंतर सुरक्षा दलाचे या परिसराला घेरला आणि नक्षलवांद्याना अटक केली होती,अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांकडून आयईडी,स्पोटके आणि इतर शस्ञसाठा जप्त करण्यात आला होता. छत्तिसगढ मध्ये एप्रिल महीण्याच्या सुरुवातीस झालेल्या चकमकीत अनेक जवानांना विरमरण आले होते,सुरुवातीला ५,नंतर २०,आणी नंतर २२ जवानांना या चकमकीत विरमण आल्याचे समोर आले होते,या बाबत आणखी एक मोठी बातमी समोर आली होती.या घटनेत 200 नक्षलवादी सहभागी असल्याचे सुरुवातीला समोर आले होते.माञ त्यानंतर या घटनेत २००नव्हे तर ७०० नक्षलवादी असल्याचे धक्कादायक माहिती समोर आली होती.

Previous articleमुखेडात ०८ मस्जीदमध्ये १ हजार ८० नागरिकांनी घेतली लस मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व युवकांचा पुढाकार
Next articleसंभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजाचे पुजन करून केले वामन दहन                                 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here