Home पुणे संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजाचे पुजन करून केले वामन दहन       ...

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजाचे पुजन करून केले वामन दहन                                 

228

राजेंद्र पाटील राऊत

संभाजी ब्रिगेडच्या वतीने बळीराजाचे पुजन करून केले वामन दहन                                                                                पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथे शेतकऱ्यांचा राजा महासम्राट बळीराजाचा गौरव करुन पुजन करण्यात आले. यावेळी बळीराजाच्या प्रतिमेला मराठा सेवा संघ उद्योग कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला.
यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली यामध्ये मराठा सेवा संघाचे गजानन आढाव संभाजी ब्रिगेडचे संघटक संजय जाधव तसेच स्वराज्य अभियानाचे मानव कांबळे यांनी आपली मनोगते व्यक्त केले यावेळी मानव कांबळे म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आधुनिक वामनाचाच अवतार आहेत. केंद्रीय भाजपच्या मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांची गाडीखाली चिरडून हत्या केली त्यावर देखील आजपर्यंत नरेंद्र मोदींनी मौन बाळगले आहे. तसेच शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करण्यात यावेत या मागणीसाठी गेल्या अकरा महिन्यांपासून दिल्ली येथे शेतकरी आंदोलन करत आहेत या आंदोलनात आतापर्यंत जवळपास सहाशे शेतकरी शाहिद झाले असून तरी आजच्या काळातील बटुक वामनाला पाझर फुटलेला नाही हे मोठे दुर्दैव आहे असे मानव कांबळे म्हणाले.
यावेळी बटुक वामनाच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे संघटक विनोद घोडके रशीदभाई सय्यद विक्रम गुंड महेश कांबळे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र पवार रवि चव्हाण अंबादास जाधव सलीम मुलानी पराग जाधव अभिषेक म्हसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना वाघमारे यांनी केली.
संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांनी मानले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी केले.

Previous articleछत्तिसगढ:५ लाखांचे बक्षिस असलेल्या नक्षली कंमाडर ठार,मोठा शस्ञसाठा जप्त नक्षल व पोलिस चकमक
Next articleदिवाळीनिमित्त नायगाव तालुक्यातील मोरे देगाव येथे दीप उत्सव साजरा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.