Home नांदेड मुखेडात ०८ मस्जीदमध्ये १ हजार ८० नागरिकांनी घेतली लस मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित...

मुखेडात ०८ मस्जीदमध्ये १ हजार ८० नागरिकांनी घेतली लस मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व युवकांचा पुढाकार

90
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेडात ०८ मस्जीदमध्ये १ हजार ८० नागरिकांनी घेतली लस

मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक व युवकांचा पुढाकार

मुखेड /प्रतिनिधी-मनोज बिरादार युवा मराठा न्युज नेटवर्क

कोरोना आजाराला रोखण्यासाठी मिशन ७५ या अभियानातंर्गत जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या संकल्पनेनुसार ग्रामीण व शहरी भागात लसिकरण मोहीम राबविण्यात येत असुन तालुका प्रशासनाकडुन गावोगावी जावुन नागरिकांना लस घेण्याचे आवाहान करण्यात येत आहे प्रशासनाच्या या आवाहानास शहरातील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुखेड शहरातील आठ मस्जीदीमध्ये १ हजार ८० नागरिकांचे लसीकरण करून घेतले आहे.त्यामुळे मस्जिदीत एवढ्या मोठ्या प्रमाणात लसिकरण झाल्याबद्दल प्रशासनाकडुन कौतुक करण्यात आले.
सदर लसिकरण मोहीमेत या मोहिमेत शहरतील मदिना मस्जीद मधे अदनान पाशा यांच्या पुढाकाराने १४९ तर मनोहर टाॅकिज जवळ कुवैते इस्लाम मस्जीद मध्ये रियाज शेख यांच्या पुढाकाराने १४६ तसेच शिशु मंदिर जवळील रजा चौक मस्जीद येथे योगेश मामीलवाड यांच्या पुढाकाराने ४३ तर आयेशा मस्जीद मध्ये बबलू मुल्ला यांच्या पुढाकाराने १४० तसेच गौसिया मस्जीद येथे सय्यद शमशोदिन व नगरसेवक नासेरखाँ पठाण यांच्या पुढाकाराने ८५ तर सावित्रीबाई शाळा फुलेनगर येथील खुबा मस्जीद मध्ये राहूल लोहबंदे मित्रमंडळ यांच्या पुढाकाराने ७८ तसेच गरिब नवाज मस्जीद मध्ये सदर जिलानी शहा यांच्या पुढाकाराने ८४ तर उमर फारूक मस्जीद येथे शौकत होणवडजकर व शादुल होणवडजकर ३५५ असे एकून १ हजार ८० नागरीकांचे लसीकरण करण्यात आले. लसिकरण शिबिर यशस्वितेसाठी आयोजकासह, मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरीक व तरूणांनी परिश्रम घेतले सदर उपक्रमांचे तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले, वैद्यकीय अधिक्षक डाॅ सुधाकर तहाडे, मुुु्ख्याधिकारी महेश हांडे यांनी युवकांच्या कार्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

Previous articleमौजे रावणगाव ता.मुखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या निवडी संपन्न.
Next articleछत्तिसगढ:५ लाखांचे बक्षिस असलेल्या नक्षली कंमाडर ठार,मोठा शस्ञसाठा जप्त नक्षल व पोलिस चकमक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here