• Home
  • कोल्हापूर शहरात थुंकीमुक्त आभियान

कोल्हापूर शहरात थुंकीमुक्त आभियान

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201214-WA0016.jpg

कोल्हापूर शहरात थुंकीमुक्त आभियान

कोल्हापूर शहरात गेली अडीच महिने शहरभर मोकाट रोगराई पसरवत फिरणाऱ्या थुंकी बहाद्दरांना चाप लावण्यासाठी अनेक नागरिक व सामाजिक संघटना यांनी सोशल मीडिया, तसेच रस्त्यावर उतरून युद्ध पुकारले आहे. आज अँटी स्पिट मूव्हमेंट कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात जनजागृती मोहीम राबवली. पालिका सक्रिय झाली आहेच, पण शासनाने सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणीही नागरिक, सामाजिक संस्था कडून केली जात आहे.
याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कडून जन जागृती पर बॅनर्स, स्टिकर्स वितरण करण्यात आले. तसेच परिसरातील दुकानामध्ये, बस स्थानकातील बसेस वर प्रबोधन करून स्टिकर्स लावण्यात आले.
रोगप्रसार,सामाजिक स्वच्छता व आरोग्य यांच्याशी निगडित गंभीर विषयाबाबत नागरिक तसेच विविध संघटना मोठ्या संख्येने एकत्र येऊन सक्रिय पाठिंबा देत आहेत.
या प्रसंगी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे विरोधी चळवळ कृती समितीच्या कोल्हापूर च्या कार्यकर्त्यांसह, भागातील नगरसेवक आशिष ढवळे, पानपट्टी संघटनेचे अरुण सावंत, फेरीवाले संघटनेचे कॉम्रेड दिलीप पवार, खाजगी बस प्रवासी संघटनेचे सतीशचंद्र कांबळे, रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी चे अध्यक्ष एस. एन. जांभळे, आरटीओ अधिकारी प्रदीप शिंगारे, फेरीवाले संघटना, नागरिक , प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.या उपक्रमाचे नेतृत्व दीपा शिपुरकर,राहुल राजशेखर,अभिजीत गुरव,सुनीता मेंगाणे, महेश ढवळे, विजय धर्माधिकारी यांनी केले .
युवा मराठा न्यूज नेटवर्क

anews Banner

Leave A Comment