Home मराठवाडा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने हसन सय्यद यांचा गौरव

छत्रपती शिवाजी महाराज पुरस्काराने हसन सय्यद यांचा गौरव

186
0

राजेंद्र पाटील राऊत

छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्काराने हसन सय्यद यांचा गौरव
_________________________

औरंगाबाद बबन निकम विभागीय संपादक युवा मराठा न्यूज नेटवर्क

_________________________

जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार सोहळा, दिनांक 1 जानेवारी रोजी विनायकराव पाटील सभागृह पंचायत समिती वैजापूर येथे, विविध मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला,
यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला, यंदाच्या पुरस्कारासाठी लोकशाही मराठी पत्रकार संघाचे औरंगाबाद जिल्हा प्रभारी तथा दैनिक मराठवाडा साथीचे प्रतिनिधी हसन सय्यद लोणीकर यांची निवड झाल्यानंतर त्यांना तो कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक शिवसेनेचे नेते संजय पाटील निकम व उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास प्रजापति साहेब आयोजक सूर्यकांत मोठे आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हसन सय्यद हे एक अभ्यासू पत्रकार ग्रामीण भागातील शोध पत्रकारिता निर्भीड पत्रकार म्हणून ओळखले जातात, त्यांचे कार्य नव्या पिढीसमोर कायम राहावे या विधायक हेतूने हा पुरस्कार, जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात व इतर क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार दरवर्षी दिला जातो संपूर्ण महाराष्ट्रातील समाजाप्रती संविधानाची जाणीव व समाजाप्रती बांधिलकी असणाऱ्या व्यक्तींना, शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
लोणी खुर्द येथील पत्रकार हसन सय्यद यांनी प्रिंट मीडियातील सातत्याने ग्रामीण विकासाच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आहे, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विधायक व संस्कृत पत्रकारितेचा वसा व वारसा ते जोपासत आहे तसेच शिक्षण महिला सबलीकरण साहित्य व आध्यात्मिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील दैनंदिन घडामोडींवर लक्ष वेधून घेणारी विधायक विकासात्मक पत्रकारिता त्यांच्या आवडीचा विषय आहे, त्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी वैजापूरचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक शिवसेनेचे नेते संजय पाटील निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास प्रजापति, सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम सिंग ठाकूर, किशोर मगर तालुकाध्यक्ष छावा संघटना, श्रमिका दळवी समाजसेविका आत्मनिर्भर फाउंडेशन मुंबई,
अँन्ड धनराज अंभोरे अध्यक्ष जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,
संतोष दौंड सचिव जिजाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, आयोजक सूर्यकांत मोठे सचिव पोलीस पाटील संघटना यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Previous articleशिवसेनेच्या वतीऩे गडचिरोली शहरात आरोग्य शीबीर आयोजीत।
Next articleराष्ट्रीय युवा मराठा पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे रत्नागिरीमध्ये उत्साही वातावरणात प्रकाशन..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here