Home मराठवाडा छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची बैठक संपन्न.

छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची बैठक संपन्न.

43
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_124759.jpg

छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची बैठक संपन्न.
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख

याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 13 मार्च 2024 रोज बुधवार रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असतांना सकाळी लातूर येथुन छत्रपती संभाजीनगर साठी त्यांनी प्रस्थान केले.परंतुर राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सरळ छत्रपती संभाजीनगरला न जाता त्यांनी आपल्या चालकाला गाडी जालन्याच्या दिशेने वळविण्यास सांगितले आणि ते सरळ जालना येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदेशकार्याध्यक्ष तथा विश्वासू आणि राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या हृदयात जागा निर्माण करणारे व संघटनेसाठी सतत कार्यरत राहुन केवळ संघटनेची काळजी वाहणारे संघटनेविषयी बाबांना वेळोवेळी संघटनेच्या कार्याविषयी सविस्तर माहिती देणारे श्री वसंतराव देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेटले.यावेळी संघटनेच्या कार्याविषयी सविस्तर चर्चा केली जवळ जवळ दोन तास चर्चा करण्यात आली असून संघना बांधनिविषयी रणनीती आखली.यानंतर आदरणीय बाबांनी जेवणाचा आस्वाद घेतला.
त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने त्यांची गाडी सुसाट वेगाने निघाली. छत्रपती संभाजीनगर येथे संघटनेचे कार्यकर्ते आदरणीय बाबांचे विचार ऐकण्यासाठी प्रतिक्षा करत होते.अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष तथा सर्वेसर्वा प्रदीप बाबा खंडापूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा विभागीय अध्यक्ष दादासाहेब काळे यांच्या अध्यक्षतेखाली संभाजीनगर येथे पार पडली. या बैठकीसाठी अनेक पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी अनेक महत्त्वाचे ठराव यावेळी घेण्यात आले व अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी अनेक ठराव घेण्यात आले यामध्ये – १ ) संघटनेच्या ध्येय धोरणाशी निगडित कोणत्याही गोष्टी अमलात आणण्यापूर्वी त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अधिकाऱ विचारात घेऊन सर्व बहुमताने निर्णय जाहीर करण्यात यावा. यानंतर मीडिया प्रमुखाशिवाय कोणीही संघटने बद्दल बाहेर वक्तव्य किंवा प्रसिद्धी देऊ नये. संघटनेचे ध्येय धोरण सर्वांना बंधनकारक राहतील व संघटनेच्या तीन पेक्षा जास्त बैठका व कार्यक्रमांना गैरहजर राहणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांची पदे बरखास्त करण्याचा अधिकार संघटनेला राहील. यापुढे संघटनेचा प्रोटोकॉल व पदाची गरिमा सर्वांना बंधनकारक राहील. संघटना बदनाम होईल किंवा संघटनेविषयी बदनामीकारक कामे केली जातील अशा पदाधिकाऱ्यांची पदं तात्काळ रद्द करण्यात येतील. यासह अनेक ठराव या बैठकीत सर्व बहुमताने मंजूर करण्यात आले, तर यावेळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तीन जिल्हा अध्यक्ष नेमण्याचा ठराव घेण्यात आला यात सिल्लोड सोयगाव फुलंब्री आणि छत्रपती संभाजी नगर यासाठी एक वैजापूर गंगापूर पैठण यासाठी एक तर कन्नड खुलताबाद आणि छत्रपती संभाजी नगर यासाठी एक असे तीन जिल्हाध्यक्ष नेमण्याचे ठरले तरी इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी व तालुकाध्यक्ष तालुका कार्यकारणी लवकर जाहीर करण्यात येईल असे ठरले यावेळी संघटनेचे पदार्पण फादर बॉडी, महिला आघाडी, युवा आघाडी, किसान आघाडी, व व्यापारी आघाडी यांच्याही निवडी करण्याचे यावेळी ठरले. यात यावेळी काही पदांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या यात मराठवाडा विभागीय प्रसिद्धीप्रमुख मीडिया प्रमुख म्हणून पत्रकार कपिल जयस्वाल यांची निवड करण्यात आली तर सोयगाव, सिल्लोड, फुलंब्री, संभाजीनगर या विभागासाठी प्रदीप संतोष जगताप यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर संभाजीनगर खुलताबाद कन्नड या विभागासाठी – जिल्हाध्यक्षपदी पत्रकार सुधाकर जेठे यांची निवड करण्यात आली .संभाजीनगर शहर महिला आघाडीच्या प्रमुख पदी श्रीमती मनीषा मानकर यांची निवड करण्यात आली, तर महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी संभाजीनगर पश्चिम विभागाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून अनुजा सदार यांची निवड करण्यात आली, संभाजीनगर जिल्हा संघटक सुनील वैद्य व संभाजीनगर जिल्हा सरचिटणीस म्हणून संदीप मानकर तर सिल्लोड तालुका अध्यक्ष म्हणून गजानन काळे यांची यावेळी निवड करण्यात आली . भोकरदन तालुका सरचिटणीस पदी भरत मानकर यांची निवड करण्यात आली .यावेळी कार्यकारणीचे पदे व त्याचा आराखडा पटलावर ठेवून मंजूर करण्यात आला यावेळी निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रीय अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी संभाजीनगर शहरात लवकरच विभागिय मेळावा घेण्याचा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला. आभार प्रदर्शन प्रदीप जगताप यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता झाली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here