Home जालना माहोरा सर्कल मधून संजय गांधी /इंदिरा गांधी /श्रावण बाळ /अपंग निराधार अनुदान...

माहोरा सर्कल मधून संजय गांधी /इंदिरा गांधी /श्रावण बाळ /अपंग निराधार अनुदान पेंशन योजनांच्या फाईलला भरभरुन मंजुरी -जाफराबाद तालुक्यातून 4200 फाईलींना मंजूरी –विलास पाटील इंगळे

329
0

आशाताई बच्छाव

IMG_20240320_124358.jpg

माहोरा सर्कल मधून संजय गांधी /इंदिरा गांधी /श्रावण बाळ /अपंग निराधार अनुदान पेंशन योजनांच्या फाईलला भरभरुन मंजुरी -जाफराबाद तालुक्यातून 4200 फाईलींना मंजूरी –विलास पाटील इंगळे
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
सविस्तर वृत्त असे की, ११/०१/२०२४ ला तहसील कार्यालय जाफराबाद येथे संजय गांधी /इंदिरा गांधी /श्रावण बाळ निराधार पेंशन अनुदान योजना चे अध्यक्ष मा .आमदार श्री संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षेखाली तालुकास्तरीय समितीची नुकतीच बैठक घेण्यात आली होती. निराधार संचिका जाफराबाद तहसील कार्यालयात मध्ये प्राप्त झालेल्या पैकी सदरील प्रस्ताव तालुका समिती समोर ठेऊन पडताळणी करून निकष मध्ये बसलेल्या जवळपास 4200 फाईलींना मंजूर देण्यात आली व संजय गांधी /इंदिरागांधी /श्रावण बाळ योजनेअंतर्गत अनुदान चालू करण्याचे मानस असल्याने मंजुरी देण्यात आले
तालुक्यामध्ये केंद्रीय मंत्री मा .श्री. रावसाहेब पाटील दानवे मा. आमदार श्री .संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातून जाफराबाद भोकरदन मतदारसंघाला नंबर १ जास्तीत जास्त फाईल मंजूर करुन निराधारांना आधार देण्याचे काम आमदार श्री संतोष पाटील दानवे, तसेच तहसीलदार डॉ. सारिका भगत व जेष्ठ सदस्य विजय नाना परिहर यांच्या माध्यमातून करण्यात आले यामध्ये माहोरा सर्कल चे संजय गांधी श्रावण बाळ निराधार पेंशन अनुदान योजनेचे सदस्य श्री विलासराव पाटील इंगळे यांच्या माध्यमातून माहोरा सर्कल मधील विधवा /अपंग/ इंदिरागांधी /संजय गांधी / श्रावण बाळ सह निराधारांना जास्तीत जास्त फाईली मंजूर करण्यासाठी महत्त्वाचे प्रयत्न करुन या सर्व योजनांची माहिती माहोरा तसेच माहोरा सर्कल मधील सर्व गावांना दिली . तसेच फाईल मंजूर करुन घेतल्या त्या बद्दल माहोरा सर्कल च्या वतीने विलासराव पाटील इंगळे यांचे अभिनंदन होत आहे त्यांच्या युद्धभूमी आसई गावातून सुद्धा 100 पेक्षा जास्त फाईल मंजूर करुन निराधारांना आधार देण्याचे काम त्यांनी केले त्यामुळे गावातून सुद्धा त्यांचे कौतुक होत आहे. तसेच त्यांना व्हॉटस्अप, फेसबुक , फोन कॉल च्या माध्यमातून माहोरा सर्कल मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गावातील पगारीचे पत्र वाटप करताना समीतिचे सदस्य तथा माजी सरपंच विलासराव पाटील इंगळे ,सरपंच विजय पा इंगळे उपसरपंच भगवान पा. इंगळे, सदस्य सुनील इंगळे ,चेअरमन नारायण पा. इंगळे तंटामुक्ती अध्यक्ष भगवान पा कोरडे, शिवव्याख्येते कृष्णा पा. इंगळे, पंडितराव इंगळे ,बापूराव कोरडे इत्यादीसह गावतील पुरुष व महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

Previous articleलोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश
Next articleछत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची बैठक संपन्न.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here