Home Breaking News ऑनलाइन शिक्षण द्या, पण अभ्यासाचे ओझे टाळा ; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना...

ऑनलाइन शिक्षण द्या, पण अभ्यासाचे ओझे टाळा ; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी – विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

105
0

ऑनलाइन शिक्षण द्या, पण अभ्यासाचे ओझे टाळा ; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी –
विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

नवी दिल्ली,दि. १५ – कोरोनाच्या साथीमुळे देशभरातील शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना विविध आॅनलाइन माध्यमांतून शिक्षण कसे द्यावे याविषयीच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना केंद्रीय मानवसंसाधन विकास मंत्रालयाने मंगळवारी प्रसिद्ध केल्या. प्रत्यक्ष वर्गात दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला आॅनलाइन शिक्षण हा परिपूर्ण पर्याय नाही. त्यामुळे त्याचा वापर गरजेनुसारच करावा, असे यात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच आॅनलाइन शिक्षण जरूर द्या, पण त्याने अभ्यासाचा असह्य ताण पडून विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडणार नाही, याची काळजी घेण्यावर त्यात भर देण्यात आला आहे.

मंत्रालयाने यासाठी ‘प्रज्ञाता’ या शीर्षकाची ३८ पानांची ेक सविस्तर पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यात आॅनलाइन शिक्षण कोणाला, कसे, कधी व किती वेळ दिले जावे याचे शिक्षक, विद्यार्थी व पालक या सर्वांच्या दृष्टीने साद्यंत विवेचन करण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) ही मार्गदर्शिका तयार केली आहे. त्या केवळ सूचना आहेत. प्रत्येक राज्य स्थानिक परिस्थिती, साधनांची उपलब्धता व गरज यानुसार त्यात सोयीनुसार फेरबदल करू शकतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या पुस्तिकेची एकूण सहा प्रमुख विबागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सध्या ही मार्गदर्शिका आताची कोविडबाधित परिस्थिती विचारात घेऊन तयार करण्यात आली असली तरी देशातील शिक्षण एकूणच दर्जेदार व अधिक परिपूर्ण करण्याची नव्या काळाला अनुरूप अशी पद्धत यातूनच उभी राहू शकेल, असा विश्वास व्यक्त करून त्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला आहे. ही मार्गदर्शक पुस्तिका मंत्रालयाच्या mhrd.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

कोणाला किती वेळ शिकवावे?
पूर्व प्राथमिक : बालवाडी, छोटा शिशू व मोठा शिशू वर्गातील मुलांना अजिबात नाही. फार तर आठवड्यातून एक दिवस ठरवून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्याशी ३० मिनिटे संवाद.
इयत्ता १ ली ते ८ वी : आठवड्यातून किती दिवस आॅनलाइन वर्ग घ्यावे हे राज्य सरकारांनी ठरवावे. परंतु त्या ठरलेल्या दिवशी प्रत्येकी ३०ते ४५ मिनिटांचे जास्तीत जास्त दोन वर्ग.
इयत्ता ९ ते १२ वी : राज्य सरकारने ठरवून दिलेल्या दिवशी प्रत्येकी ३० ते ४५ मिनिटांचे चार वर्ग.

Previous article*उद्या बारावीचा निकाल**📝(▪️राहुल मोरे निवासी संपादक युवा मराठा न्यूज▪️)
Next articleनांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 6.27 मि.मी. पाऊसाची नोंद – नांदेड, दि. १५ ; राजेश एन भांगे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here