Home अमरावती महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील(असो‌.) संघटना जिल्हास्तरीय स्नेह मेळावा व कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा...

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील(असो‌.) संघटना जिल्हास्तरीय स्नेह मेळावा व कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा पोलिस पाटील पुरस्कार वितरण समारंभ संपन्न

75
0

आशाताई बच्छाव

IMG_20231125_080713.jpg

महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील(असो‌.) संघटना जिल्हास्तरीय स्नेह मेळावा व कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा पोलिस पाटील पुरस्कार वितरण समारंभ संपन्न
मयुर खापरे चादुंर बाजार
राज्यातील पोलीस पाटील यांच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील (असो.) संघटना राज्यात कार्य करते. अमरावती जिल्ह्यातील पोलिस पाटील यांना संघटीत करून आणि त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी संघटनेचे राज्य अध्यक्ष महादेव नागरगोजे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तर पश्चिम विदर्भ समन्वयक महिला आघाडी शिवसेना आसावरीताई देशमुख, संचालक वैजनाथ सहकारी साखर कारखाना तथा राज्य समन्वयक पोलीस पाटील संघटना माऊली मुंडे पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक यवतमाळ तथा राज्य कार्याध्यक्ष रुपेश पाटील सावरकर, राज्य उपाध्यक्ष डॉ.रविद्र डोईफोडे पाटील,सिने अभिनेता रवी वानखडे, जालना जिल्हा अध्यक्ष अर्जुन ढगे पाटील, वर्धा जिल्हाध्यक्ष सागर खोंडे पाटील,रक्तवाहिनी एम एच २७ अध्यक्ष प्रितम लांडे, विदर्भ महासचिव प्रा.टि.बी.रामटेके पाटील,ह.भ.प.चिखलकर महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे अमरावती जिल्हाध्यक्ष राहुल उके पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला कर्तव्यदक्ष आदर्श जिल्हा पोलिस पाटील पुरस्कार गाव पातळीवर अतुलनीय कार्य करीत असल्याबद्दल आष्टगाव तालुका मोर्शी पोलीस पाटील आशिष म्हाला पाटील,खोजनपुर तालुका अचलपूर पोलीस पाटील संजय बुरंगे पाटील,देहणी तालुका तिवसा पोलीस पाटील सिमा उमेश राऊत पाटील,पंढरी तालुका वरुड पोलीस पाटील रुपेश रामदास उईके पाटील,खेलतपमाळी (परतवाडा) पोलीस पाटील राहुल ठाकरे पाटील, खंडाळा खुर्द तालुका नांदगाव खंडेश्वर पोलीस पाटील शुंभागी प्रमोद ठाकरे पाटील तसेच आदर्श महिला पोलिस पाटील पुरस्कार यावली शहिद तालुका अमरावती पोलीस पाटील मनिषा नागोने पाटील यांना मानपत्र देऊन प्रदान करण्यात आला. जिल्हा पोलिस पाटील संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शेतकरी चळवळीतील जिल्ह्यातील अग्रणी नाव लोकविकास संघटनेचे संघटक रमन लंगोटे पाटील यांना सर्वोत्तम आंदोलक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.सोबतच राज्य समन्वयक माऊली मुंडे पाटील यांचा कार्य गौरव करण्यात आला. यावेळी विचारमंचावर संघटनेचे विदर्भ संघटक निलाकांत पुसदेकर पाटील, विदर्भ समन्वयक उमेश देशमुख पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अश्विनी बायस्कर पाटील, माजी विदर्भ अध्यक्ष सोनाली वरगंटीवार, विदर्भ संघटक सुरेश घिये पाटील, सोशल मीडिया प्रमुख सुनील अलोने पाटील, जिल्हा उपाध्यक्ष कैलास डवले पाटील, अंकुश सांतगे पाटील,क्रिष्णा खडके पाटील, शुभांगी ठाकरे पाटील, गोकुळ झारखंडे पाटील, जिल्हा निमंत्रक संजय बुरंगे पाटील, वैभव निमकर, पोलीस पाटील करजगाव अश्विन मेहरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मोहेकर यांनी केले तर प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अमरावती राहुल उके पाटील व आभार प्रदर्शन जिल्हा उपाध्यक्ष नितीन गोरले पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष सिमा राऊत पाटील, तालुका अध्यक्ष तिवसा रविंद्र मोकादम, चांदुर बाजार तालुका अध्यक्ष श्रीनिवास तायडे पाटील, भातुकली तालुका अध्यक्ष हेमंत खरड पाटील, अचलपूर तालुका अध्यक्ष अमोल खांडे पाटील उपाध्यक्ष प्रफुल्ल भोरे पाटील, दर्यापूर तालुका अध्यक्ष आशिष गांवडे पाटील, चिखलदरा तालुका अध्यक्ष सुधाकर चिलात्रे पाटील,धारणी तालुका अध्यक्ष संजय वर्मा पाटील,वरुड तालुका अध्यक्ष किशोर काळे पाटील, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष योगेश फुके पाटील, लोणी अध्यक्ष विनोद चोपडे पाटील यांनी यशस्वी नियोजन केले. राज्यातील विविध जिल्ह्यांतील पोलीस पाटील अमरावती जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील पोलीस पाटील या कार्यक्रमात उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here