Home भंडारा भंडाऱ्याकडून पवनी कडे जात असलेल्या ट्रेलरची दुचाकी मोटरसायकलला धडक मोटर सायकल स्वार...

भंडाऱ्याकडून पवनी कडे जात असलेल्या ट्रेलरची दुचाकी मोटरसायकलला धडक मोटर सायकल स्वार मनीषकुमार पांडे घटनास्थळी ठार

237
0

आशाताई बच्छाव

IMG_20231125_180651.jpg

भंडाऱ्याकडून पवनी कडे जात असलेल्या ट्रेलरची दुचाकी मोटरसायकलला धडक मोटर सायकल स्वार मनीषकुमार पांडे घटनास्थळी ठार

ट्रेझर चालकाचा निष्काळजीपणा

अड्याळच्या नागरिकांनी केला रास्ता रोको आंदोलन

कारधा ते निलज सिमेंट रस्त्याचे बांधकाम अर्धवट तात्काळ पूर्ण करण्याची जनतेची मागणी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 25 नोव्हेंबर 2023 ला सव्वा बाराच्या दरम्यान भंडाऱ्याकडून पवनी कडे फिर्यादी हे आपले स्वगावी जात असताना यातील मृतक नामे मनीषकुमार रामकृष्ण पांडे वय 34 वर्षे राहणार गुरुनानक वार्ड शांतीनगर भंडारा आपले मोटार सायकल क्रमांक MH- 35 AK -36 68 जात असताना मागेहुन येणाऱ्या टेलर क्रमांक MH40 CM 57 57 चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरगाव वेगाने व निष्काळजीपणाने आणि हयगय पणाने चालवून मागेहून धडक दिल्याने यातील मृतकाला उपचारा कामी ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे नेले असता डॉक्टरांनी तपासून मरण पावल्याचे सदर फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून व मा ठाणेदार साहेब त्यांच्या आदेशावरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे .दाखल अधिकारी पोलीस हवालदार तळखंडे ब. नं. 42 ,तपास अधिकारी सहायक फौ. सुभाष मस्के ब .नं .207 पुढील तपास करीत आहेत. फिर्यादी चंद्रेश प्रकाश काटेखाये वय 35 वर्षे राहणार शांतीनगर गुरुनानक वार्ड भंडारा व्यवसाय नोकरी तहसील कार्यालय तुमसर महसूल सहायक यांच्या तक्रारीवरून अप. क्रमांक 255/2023 कलम 279,304 (a )भादवी सह कलम 184 ,134 (a)( b) 177 मो .वा .का . अंतर्गत पोलीस स्टेशन अड्याळ येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .विशेष म्हणजे कारधा ते नीरज फाटा या मुख्य रस्त्याचे सिमेंट करण्याचे काम मागील तीन वर्षापासून सुरू आहे परंतु बऱ्याच ठिकाणी काम अर्धवट आहे .त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीस अडचणनिर्माण होत आहे .याबाबतीत अनेकदा संबंधित विभागाकडे तक्रारी करण्यात आलेल्या आहेत .परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आणि त्यामुळेच आज एका युवकाला आपला प्राण गमवावा लागला आहे ही भरपाई कधीच भरून निघणार नाही. त्यामुळे आज अड्याळ च्या जनतेने एकत्र येऊन आज भंडारा पवनी मार्गावर अड्याळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here