Home भंडारा   30 वर्षानंतर पुन्हा एकदा गुरुजी आणि विद्यार्थी यांची भेट (असी पाखरे...

  30 वर्षानंतर पुन्हा एकदा गुरुजी आणि विद्यार्थी यांची भेट (असी पाखरे येती आणि स्मृती ठेऊनिया जाती)

132
0

आशाताई बच्छाव

IMG-20231125-WA0148.jpg

30 वर्षानंतर पुन्हा एकदा गुरुजी आणि विद्यार्थी यांची भेट (असी पाखरे येती आणि स्मृती ठेऊनिया जाती)

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील चिचाळ येथील जिल्हा परिषद हायस्कूल फ्रेंड्स ग्रुप 1990 बॅच च्या वतीने दिवाळी च्या शुभ पर्वावर 21 नोव्हेंबर 2023 ला सरस्वती कॉन्व्हेन्ट स्कूल चिचाळ येथे फॅमिली गेट टुगेदर चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 30 वर्षानंतर प्रथमच 1990 बॅच ला शिकवणारे शिक्षक धांडे सर, वाघाये सर , वडेट्टीवार सर, विजय भुरे , मोटघरे सर, पचारे सर, नांदेकर सर आणि त्यांचे विद्यार्थी एकत्र आले होते .भारावून जाणारा हा क्षण होता . डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोंचे पूजन कार्यक्रमाची सुरुवात झाली .प्रमुख उपस्थिती म्हणून मधुसूदन काटेखाये सरपंच ग्रा.प. चिचाळ ,जगतराम गभणे उपसरपंच, तुकेश वैरागडे पो.पा. ,सविता बिलवणे प.स.सदस्या आणि सर्व वर्ग मित्र सहपरिवार उपस्थित होते .सर्वांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सर्वांनी आपले मनोगतातून भूतकाळातील अविस्मरणीय आठवणींना उजाळा दिला .शेवटी सर्वांनी एकत्रित स्नेहभोज केले .प्रसंगी सर्व वर्ग मित्र यांचे चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजू नंदपुरे यांनी तर प्रास्ताविक प्रा.नीलकमल उके यांनी आणि आभार प्रा.महेंद्र काटेखाये यांनी मानले. ह्या आनंददायी सोहळ्यास सर्व वर्ग मित्रांनी सहकार्य केले.

Previous articleभंडाऱ्याकडून पवनी कडे जात असलेल्या ट्रेलरची दुचाकी मोटरसायकलला धडक मोटर सायकल स्वार मनीषकुमार पांडे घटनास्थळी ठार
Next articleखा. प्रतापराव पाटील चिखलीकरांकडून निराधार महिलेला मदतीचा हात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here