Home जालना जालन्यातील चार धावपटूंनी लोणावळा येथील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलो मीटर पूर्ण...

जालन्यातील चार धावपटूंनी लोणावळा येथील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलो मीटर पूर्ण केली!

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240228_073617.jpg

जालन्यातील चार धावपटूंनी लोणावळा येथील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलो मीटर पूर्ण केली!
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): 27 फेब्रुवारी रविवारच्या दिवशी लोणावळा येथे टाटा ग्रुपने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अल्ट्रा मॅरेथॉन पस्तीस व पन्नास कि. मी. ंंठेवली होती. या स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले होते. एक गट 45 पर्यंतच्या महिला व पुरुषांसाठी तर दुसरा गट हा पंचेचाळीस वर्षाहून अधिकांसाठी होता. या स्पर्धेत देशभरातून पुरुष व महिला धावपटूंनी हजारोच्या संख्येने या स्पर्धेत भाग घेतला होता. हि स्पर्धा 800 मीटर चढाईची असते. जगंल आणि डोंगराच्या वाटा मधून जाते. चढ आणि उतार अत्यंत कठीण असल्याने ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक धावपटूंना एक मोठी कसरत करावी लागते.
जालन्यातील जितेंद्र अग्रवाल, संजय अंपळकर, मिलींद खेरुडकर व राजू सैनी या चार धावपटूंनी ही कठीण स्पर्धा केली. ही स्पर्धा पूर्ण करतांना सर्वांना वेगवेगळा अनुभवही आला. कारण ही स्पर्धा पूर्ण करतांना इतक्या उंच व लगेचच खाली उतारावर धावणे हे सर्वांनासाठी कठीण कार्य होते. रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी पहिल्यांदाच असे पळण्याचा अनुभव आला. सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत ही स्पर्धा सुुरु होती व भाग घेतलेल्या सर्वच धावपटूंनी पूर्ण केली. इतक्या कठीण स्पर्धेत सुध्दा आम्हाला 70- 75 वर्षापर्यंतचे महिला व पुरुष धावपटू पळतांना दिसले. ज्याच्यामुळे आम्हाला खूप मोठे प्रोत्साहन मिळाले.
पन्नास कि. मी.ची अल्ट्रा मॅरेथॉन जितेंद्र अग्रवाल यांनी केवळ पाच तास 33 मिनिटात पूर्ण केली तर राजू सैनी यांनी सहा तास 54 मिनिटात तर संजय अंपळकर आणि मिलींद खेरुडकर या दोघांनी सात तासात सोबतच पूर्ण केली. त्यांच्या या यशाबद्दल जालन्याच्या फॅब रनर्स ग्रुप व इतर खेळ प्रेमींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रती सतीश घाटगे यांची कृतज्ञता :  शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी घरपोच आली ‘समृद्धी’ची साखर
Next articleसहकार बँक कॉलनीत आज हभप महंत बलदेवानंद महाराज गिरी यांचे किर्तन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here