Home जालना सहकार बँक कॉलनीत आज हभप महंत बलदेवानंद महाराज गिरी यांचे किर्तन

सहकार बँक कॉलनीत आज हभप महंत बलदेवानंद महाराज गिरी यांचे किर्तन

16
0

आशाताई बच्छाव

IMG_20240228_073945.jpg

सहकार बँक कॉलनीत आज हभप महंत बलदेवानंद महाराज गिरी यांचे किर्तन
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): येथील सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प. पू. भगवान महाराज आनंदगडकर यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह, भागवत कथा व विजय ग्रंथ पारायण सोहळ्यास कालपासून प्रारंभ झाला असून बुधवारी हभप श्री, महंत बलदेवानंद महाराज गिरी (गोरखनाथ आश्रम सोमनाथ) यांचे किर्तन होणार आहे. दरम्यान, भागवत कथेचे पुष्प गुंफतांना राहुल महाराज जोशी यांनी आजच्या पहिल्याच दिवशी उपस्थित श्रोत्यांचे कान टोचून त्यांना चांगले वागण्याचा आणि बोलण्याचा सल्ला दिला. तर उद्या गुरुवारी हभप श्री. राजेंद्र महाराज वाघमारे (गोंदीकर), शुक्रवारी हभप श्री. पाडुरंग महाराज डिग्रसकर (सेलू) आणि रविवारी हभप श्री.  उध्दव महाराज राऊत (आळंदी) यांचे हरी किर्तन होणार आहे. तर सोमवार दि. 4 मार्च रोजी सकाळी 8.30 ते 12 पालखी मिरवणूक (दिंडी) सोहळा तर 12 ते 2 या दरम्यान हभप श्री. संत भगवान महाराज आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन होणार असून श्री. गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा हा रविवार दि. 3 मार्च 2024 रोजी सकाळी 8.30 ते 10.30 यावेळेत महाभिेषेक तर दुपारी 12 वाजता श्री च्या प्रगट दिनाची महाआरती होणार आहे.यानिमित्त दररोज सकाळी 4 ते 6 काकडा भजन, 7ते 8 विष्णूसहस्त्र नाम, 8 ते 9 श्री गजानन विजय ग्रंथ पारायण, 10 ते 11 गाथा भजन, 1 ते 5 श्रीमद् भागवत कथा तर सायंकाळी 5 ते 7 हरिपाठ आणि रात्री 9 ते 11 यावेळेत हरिकिर्तन होणार आहे. श्री जगानन विजय ग्रंथ पारायणाचे व्यासपीठ हभप श्री आत्माराज महाराज बिडवे हे सांभाळत आहेत. या सर्व धार्मिक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. गजानन महाराज विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आर्दड आणि सचिव श्री. सपंतराव पाटील व समस्त विश्वस्तांनी केले आहे.
—————————————————

Previous articleजालन्यातील चार धावपटूंनी लोणावळा येथील टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 50 किलो मीटर पूर्ण केली!
Next articleमराठी राजभाषा दिन संस्कार प्रबोधिनीत रंगली प्रकट मुलाखत :विद्यार्थी बनले पत्रकार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here