Home अमरावती टोम्पे बी.एड कॉलेजमध्ये दीपोत्सव व स्वागत समारंभाचे यशस्वी आयोजन

टोम्पे बी.एड कॉलेजमध्ये दीपोत्सव व स्वागत समारंभाचे यशस्वी आयोजन

181
0

आशाताई बच्छाव

IMG_20231110_173114.jpg

टोम्पे बी.एड कॉलेजमध्ये दीपोत्सव व स्वागत समारंभाचे यशस्वी आयोजन
मयुर खापरे चादुंर बाजार
स्थानिक स्व.संजय टोम्पे व स्व. समीर देशमुख शिक्षण महाविद्यालय चांदूरबाजार येथे दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी दीपोत्सव व स्वागत समारंभ २०२३’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शेजव हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.भास्करदादा टोम्पे तसेच विशेष उपस्थिती मध्ये संस्थेचे सचिव प्रा. डॉ. विजय के टोम्पे, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, प्रा. डॉ.नंदकिशोर गव्हाळे समन्वयक बी.एड/ डी.एड हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. माया देशमुख यांनी सविस्तरपणे मांडून विद्यार्थ्यांना दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर बी.एड भाग -२ च्या प्रशिक्षणार्थी कोमल बोबडे, शिबा कौसर, यांनी दीपोत्सवाचे महत्व आपल्या मनोगतातून मांडले. तर आराधना राखोंडे यांनी दीपोत्सवावर आधारित आपल्या सुरेल आवाजात गीत सादर केले.
त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. भास्करदादा टोम्पे, प्रा.डॉ. विजय टोम्पे, प्राचार्य डॉ. राजेन्द्र रामटेके व प्रा. डॉ. नंदकिशोर गव्हाळे यांनी यथोचित विचार व्यक्त करून येणारा दीपोत्सव आपण सर्वांना आनंदाचा, भरभराटीचा जावो, जीवनातील अंधकार दूर होऊन आपले जीवन प्रकाशमान होवो अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या मार्गदर्शनतून व्यक्त केल्या. त्यानंतर डीटीएड चे प्राचार्य श्री मनीष सावरकर, व तसेच महाविद्यालयातील प्रा. योगेश कोठाळे, प्रा श्रीष हिंगे, प्रा.राहुल राजस, ग्रंथपाल डॉ.मिनल गाडवे यांनी पण मार्गदर्शन पर विचार व्यक्त करून दीपोत्सवाच्या विद्यार्थ्यांना रितसर शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात टोम्पे बी.एड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय शेजव यांनी ७ नोव्हेंबर १९०० या वर्षात भारतरत्न .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सातारा येथील शाळेमध्ये प्रवेशाचा प्रथम दिवस अर्थात विद्यार्थी दिवसाला अनुसरून योग्य असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. तसेच दीपोत्सव हा महास्वच्छतेचा महाउत्सव या अर्थाने सुद्धा दीपोत्सवाचे तितकेच महत्व आहे. असे विचार मांडून विद्यार्थ्यांना सदिच्छा व्यक्त केल्या. येणारा दीपोत्सव हा नक्कीच आपल्या जीवनात यश आणि निरोगी आरोग्य प्रदान करणारा ठरेल अशा सदिच्छा व्यक्त केल्या. या कार्यक्रमाला दोन्ही वर्गाचे बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृणाल चुनडे यांनी अत्यंत सूत्रबद्ध आणि मार्मिक भाषाशैलीत केले. तसेच दुसऱ्या सत्रातील कॉलेजच्या व बी एड भाग -२ मधील विद्यार्थ्यांच्या वतीने बी.एड भाग-१ च्या विद्यार्थ्यांकरिता, स्वागत समारंभ/ Induction programme आयोजित करून त्यांच्या परिचयातून विविध कला गुण कौशल्याचे सादरीकरण करण्यात आले. सदर स्वागत समारंभाचे संचालन साक्षी तंतरपाळे व तेजस्विनी आठवले यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार स्विटी ठाकूर यांनी मानले. सदर समारंभाची सांगता पसायदानाने करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या यशस्विते साठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय शेजव, प्रा योगेश कोठाळे, प्रा. श्रीष हिंगे, प्रा .राहुल राजस, प्रा. माया देशमुख, डॉ. मिनल गाडवे व शिक्षकेत्तर कर्मचारी मोहन केदार, राजेन्द्र खोबाडे आणि बी.एड च्या समस्त प्रशिक्षणार्थीनी परिश्रम घेतले.

Previous articleदिवाळीच्या सुटीत बाहेरगावी जातांना काळजी घ्या…. चाळीसगाव शहर पोलीसांचे आवाहन….
Next articleचिखलपहेला येथे 15 नोव्हेंबरला सौदा जन्मदात्याचा या नाटकाचे आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here