Home पश्चिम महाराष्ट्र अॅड.अविनाश काळे मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

अॅड.अविनाश काळे मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

168
0

राजेंद्र पाटील राऊत

अॅड.अविनाश काळे मराठी विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा चिफ बिरो

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा घेण्यात आलेल्या २७ डिसेंबर २०२० राज्य पात्रता परीक्षा ,अर्थात सेट परीक्षेत मराठी विषयातून अॅड.अविनाश रमेश काळे ..SET Maharashtra State Eligibility Test (MH-SET) उत्तीर्ण झाले आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी हे यश संपादन केले आहे.त्यांच्या कर्तुत्वात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.सहाय्यक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे मित्रपरिवाराकडून जोरदार अभिनंदन होत आहे.त्यांच्या यशामध्ये आई- वडील,मामा, भाऊ राहुल व बहिण अंजली ,आणि मित्र परिवार यांचा मोलाचा वाटा आहे.
त्यांनी,विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी मधून बी.ए
तर श्री.शिवाजी महाविद्यालय बार्शी मधून एम ए (मराठी) विषयातून केले.आणि राजर्षी शाहू लॉ कॉलेज बार्शी मधून एल.एल.बी चे शिक्षण पूर्ण केले.ते सध्या,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मधून ‘स्वातंत्र्योत्तर कालखंडातील मराठी कथात्मक साहित्यातील गुन्हेगारी समाजाचे चित्रण ‘ या विषयावर पीएच.डी करीत आहे.त्यांच्या यशासाठी त्यांना विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय टेंभुर्णी येथील प्राचार्य.डॉ.महेंद्र कदम, मराठी विभाग प्रमुख,डॉ.बाळासाहेब दास ,प्रा.संजय साठे आणि श्री.शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील प्राचार्य.डॉ.प्रकाश थोरात,मराठी विभाग प्रमुख डॉ.भारती रेवडकर प्रा.राजेंद्र दास,डॉ.बिरा पारसे डॉ.रविकांत शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Previous articleछत्रपती संभाजीराजेंची पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे. 🛑
Next articleमुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन महिलेचा मृत्यू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here