Home जळगाव दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी जातांना काळजी घ्या…. चाळीसगाव शहर पोलीसांचे आवाहन….

दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी जातांना काळजी घ्या…. चाळीसगाव शहर पोलीसांचे आवाहन….

57
0

आशाताई बच्छाव

IMG_20231110_172535.jpg

दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी जातांना काळजी घ्या….
चाळीसगाव शहर पोलीसांचे आवाहन….

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील – दिवाळीचा सण सुरू झाला असून आपल्या गावी जाण्याची लगबग वाढली आहे. या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी जातांना काळजी घ्या असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक, चाळीसगाव व पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन चाळीसगाव यांनी केले आहे.
दिवाळीच्या सुटीत बाहेरगावी जातांना घरात मौल्यवान दागिने वा रोख वस्तु न ठेवता ते बँकेच्या सुरक्षीत लॉकरमध्ये ठेवावेत. बाहेरगावी जातांना शेजाऱ्यांना सांगून जावे.दिवाळीच्या खरेदीसाठी जातांना दागिने घालून जावू नये, महिलांनी मौल्यवान दागिने न घालता शक्यतो नकली दागिने वापरावेत,पत्ता दाखवण्याच्या अथवा रस्ता विचारण्याच्या हेतूने अनोळखी माणसांशी संवाद साधू नये,
चोरीच्या घटना घडू नये म्हणून श्नय झाल्यास घरासमोर अथवा मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत,अनोळखी माणसांना घर भाडेतत्वावर देवू नये,ओळख पटल्याशिवाय घराचे दार उघडू नये,एटीएम कार्ड पासवर्ड फोन करून कोणाला देवू नये,वयस्कर व्यक्तींना नातेवाईक असल्याचे सांगून हातातील अंगठी व गळ्यातील चैन काढून दाखवू नका चोरीस जाण्याची शक्यता असते,
मोटारसायकल लोखंडी साखळीने झाडाला अथवा खांबाला लॉक करून ठेवणे जेणेकरून चोरीस जाणार नाही, कपड्यांवर घाण टाकून आपले लक्ष विचलीत खिशातील पैसे व गळ्यातील दागिणे चोरीस जाण्याची श्नयता असते.रात्रीच्या वेळी घराच्या पोर्चमध्ये अथवा वऱ्हांड्यात इलेक्ट्रिक लाईट चालू स्थितीत ठेवावा,बँकेतून पैसे काढण्यासाठी वयस्कर व्यक्तींना एकटे पाठवू नये,
तसेच अनोळखी व्यक्तीजवळ पैसे मोजण्यास देवू नये अथवा एटीएम कार्डचा वापर करू देवू नये,प्रवासात अथवा बाजारात जातांना मोबाईल, पैशाचे पाकीट,पर्स लक्षपूर्वक सांभाळावे, अनोळखी व्यक्ती, फेरीवाले,सेल्समन यांना घरात प्रवेश देवू नये.एखादी व्यक्ती संशयास्पद वाटल्यास तात्काळ पोलीसांना कळवावे, नागरीकांनी सतर्क राहावे असे आवाहन सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख व पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.

Previous articleअमरावती शहराला सीसीटीव्ही साठा निधी मिळे ना!: दहा पोलीस ठाण्यात हद्दीत असुरक्षित, ७७४ सीसीटीव्ही कॅमेरा ची गरज.
Next articleटोम्पे बी.एड कॉलेजमध्ये दीपोत्सव व स्वागत समारंभाचे यशस्वी आयोजन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here