Home अमरावती अमरावती शहराला सीसीटीव्ही साठा निधी मिळे ना!: दहा पोलीस ठाण्यात हद्दीत असुरक्षित,...

अमरावती शहराला सीसीटीव्ही साठा निधी मिळे ना!: दहा पोलीस ठाण्यात हद्दीत असुरक्षित, ७७४ सीसीटीव्ही कॅमेरा ची गरज.

53
0

आशाताई बच्छाव

IMG_20231110_120926.jpg

अमरावती शहराला सीसीटीव्ही साठा निधी मिळे ना!: दहा पोलीस ठाण्यात हद्दीत असुरक्षित, ७७४ सीसीटीव्ही कॅमेरा ची गरज.
———–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती शहराच्या आकार वाढीसह लोकसंख्या सुमारे १० लाखापर्यंत पोहोचली आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठ, चौक, उधाणे व सार्वजनिक ठिकाणी सतत कोणतीना कोणती दुर्घटना, गुन्हेगारांची घटना, वाद होत असतात. नागपूर नंतर सर्वच दृष्टीने महत्त्वाचे शहर म्हणून अमरावतीकडे बघितले जाते. तरीही तेथे सुरक्षेच्या दृष्टीने
सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप बसविले नाहीत. गेल्या तीन वर्षापासून मनपाच्या अर्थसंकल्पास सीसीटीव्हीसाठी तरदुद केले जात असून मनपा सह पोलीस प्रशासन गृह मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत असले तरी अद्याप निधीच आला नाही. शहरात दररोज घडणाऱ्या गुन्हेगारी घटनाबाबत सीसीटीव्हीच्या वॉच शिवाय शहर असुरक्षित झाल्याचा प्रतीक प्रतिक्रिया नागरिकांना दिल्या आहेत. पोलीस आयुक्त क्षेत्रातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण ७७४ सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता आहे. याबाबत मनपा ने ५ कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करून पोलिसाकडे पाठवला त्यासाठी तर तरतूदही केली. पोलीस प्रशासनाने गृह मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला नसून निधी आला नाही ते बघता खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी ८ सप्टेंबर २०२३ रोजी उपमुख्यमंत्र्यांना सीसीटीव्ही साठी मंजुरी देण्याची विनंती पत्रकार केली. दोन महिने उलटले तरी अद्याप शासनाकडून मंजुरी मिळाली नाही. शहरात काही संवेदनशील भाग आहेत. तसेच हृदय स्थानी असलेले अंबादेवी रोड ,० जस्तंच चौक, अंबादेवी, एकवीरा देवीचे मंदिर असलेले गांधी चौक, आंबा गेट परफेक्ट जवाहर गेट, इतवारा बाजार, रेल्वे स्टेशन चौक, मध्यवर्ती बस स्थानक, सायन्स कोर मैदान, राजापेठ ‌ नेहरू मैदान, गोपाल नगर चौक, नवी वस्ती, वेलकम पॉईंट चौक, गर्ल्स हायस्कूल, वडाळी तलाव, छत्री तलाव, पंचवटी चौक, व्ही एम व्ही, गाडगे नगर, बियाणी चौक, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हा स्त्रि रुग्णालय, सुपर स्पेशलिस्ट रुग्णालय, शाळा, कॉलेज परिसरासह चौकामध्ये सीसीटीव्हीची आवश्यकता आहे. मंजुरी देण्याची शिफारस दिल्याचेही समजते. शहरात सीसीटीव्ही बसविणे आवश्यक असल्याने उपमुख्यमंत्र्यांना शहरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याबाबत पत्र दिले. कारण याबाबत प्रस्ताव गृहमंत्रालयाकडे आधीच गेला असून, मंजुरी देण्याबाबत शिफारस झाली आहे. असे खासदार डॉक्टर अनिल बोंडे राज्यसभा यांनी सांगितले. तसेच सदर प्रस्ताव गृहमंत्र्याद्याकडे ठेवलेला असल्याचेही सांगितले. मनपा अर्थसंकल्प तरतूदही केली आहे
मनपा सह पोलीस प्रशासन सातत्याने पाठपुरावा करत असले तरी अद्याप कोणती आहे सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही असे मनपा आयुक्त देविदास पवार यांनी म्हटले याबाबत पालक मंत्र्यांकडेही निधी मंजुरीची मागणी केली आहे. जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लिखित जिल्ह्याला भेट दिली त्यावेळी त्यांच्याकडे स्थानिक जनप्रतिनिधींनी कॅमेरासाठी निधी मंजूर करावा अशी मागणी केली होती. त्यावेळी निधी मंजूर केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. परंतु अद्याप याबाबत शासनाकडून कोणताही निर्णय झालेला नाही. वाहतूक नियोजन तसेच सुरक्षेच्या दृष्टीने शहरात महत्त्वाच्या सर्व ठिकाणी सीसीटीव्ही लावल्या बाबतचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवला आहे. अद्याप मंत्रालयातून मंजुरी मिळाली नाही याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. शहरात कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस दलासह सी सी टीव्हीची आवश्यकता आहे. अधोरेखित केले होते. शहरात काही भाग हे संवेदनशील असल्यामुळे तेथे जर सीसीटीव्ही बसविले तर त्याचा पोलीस प्रशासनाला फायदा होणार आहे.

Previous articleमुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त २६ हजार रूपये सानुग्रह अनुदान
Next articleदिवाळीच्या सुटीत बाहेरगावी जातांना काळजी घ्या…. चाळीसगाव शहर पोलीसांचे आवाहन….
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here