Home पुणे भीमा नदीत सापडली १ टन वजनाची पुरातन मूर्ती         ...

भीमा नदीत सापडली १ टन वजनाची पुरातन मूर्ती           

143
0

राजेंद्र पाटील राऊत

पुणे २८ डिसेंबर युवा मराठा न्यूज पुणे ग्रामीण प्रतिनिधी महादेव घोलप
भीमा नदीत सापडली १ टन वजनाची पुरातन मूर्ती            येथील भीमा नदी पात्रातील २८ मोऱ्यांच्या रेल्वे पूलाजवळ शंकराचे मुख असलेली जवळपास १५० वर्षांपूर्वीची दगडी मूर्ती खोदकामात सापडली आहे . मूर्तीचे तोंड पाच फुट असून वजन एक टनाच्या आसपास आहे .दौंड – नगर रेल्वे लोहमार्गासाठी गेल्या १५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी दगडी कामातील पूल उभारला आहे . या पूलाच्या बाजूलाच दुसरा रेल्वे पूलाच्या पायाभरणीचे काम सध्या सुरु आहे . या ठिकाणी खोदकाम सुरू असतांना एका खड्यात ही मूर्ती सापडली . कामागारांनी ही मूर्ती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला ठेवली आहे . स्थानिकांच्यामते ही मूर्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली आहे . मात्र , मूर्तीचे वजन जास्त असल्याने ही मूर्ती वाहून येऊ शकत नाही . ती या ठिकाणची असल्याची माहिती काही तज्ञांनी व्यक्त केली . मूर्तीच्या मुखाचा भाग सापडला असून याच परिसरात इतर अवशेष सापडण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here