Home नांदेड जीवन शिंदे हे शिस्तीचे धडे व इतिहासाचे दाखले देत विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे...

जीवन शिंदे हे शिस्तीचे धडे व इतिहासाचे दाखले देत विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे शारीरिक शिक्षक

73
0

राजेंद्र पाटील राऊत

जीवन शिंदे हे शिस्तीचे धडे व इतिहासाचे दाखले देत विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे शारीरिक शिक्षक

 

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

 

श्री शंकरराव चव्हाण विद्यालय कोलंबी ता.नायगाव येथील क्रीडा शिक्षक तथा पर्यवेक्षक जीवनराव शेषराव शिंदे नियतमाना नुसार आज ३१ मार्च २०२२ रोजी सेवा निवृत्त होत असून या निमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा उल्लेखपट येथे मांडण्याचा हा प्रयत्न होय.
जीवन शेषेराव शिंदे यांचा जन्म हळदा .तालुका कंधार जिल्हा नांदेड. येथील मध्यम शेतकरी पण महानुभाव पंथीय कुटुंबात जन्म १ एप्रिल १९६४ रोजी झाला.घरची परीस्थिती मध्यमवर्गीय असल्याने व गावातच शैक्षणिक सुविधा असल्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण श्री शिवाजी हायस्कूल हळदा तालुका कंधार येथे झाले ,नंतरच्या उच्च शिक्षण साठी वडिलांनी : नेताजी सुभाष चंद्र बोस कॉलेज नांदेड.पोस्ट ग्रॅज्युएट : एम. ए . इतिहास .यशवंत कॉलेज नांदेड*
बी. पी.एड. : शारीरिक शिक्षण महाविद्यालय कवठा नांदेड.येथे केले*
धार्मिक विचार सरणीचे कुटुंबीय व हळदा येथील वटेमोड महाराज यांचे असलेले कोटुंबिक संबध यामुळे त्यांच्या विचाराने त्यांची सन : श्री शंकरराव चव्हाण हायस्कूल कोलंबी ता. नायगाव जि नांदेड.येथे शारीरिक शिक्षक या पदावर दिनांक : १८-६-१९९०रोजी निवड करण्यात आली.गावा पासून चार किमी अंतरावरच नोकरी मिळाल्याने सेवा परमोधर्म या न्यायाने आई वडिलांची सेवा करीत शिंदे यांनी कष्टाने आपल्या नोकरीच्या सेवेचे फळ प्राप्त केले.
शारीरिक शिक्षक म्हणून आयुष्यातील ३२ वर्षीय शिक्षण क्षेत्रात शिंदे यांनी आपली कारकीर्द घालवली आणि इतिहास हा आवडता विषय विद्यार्थाना मन लावून शिकवत ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले.
पूर्वी एक म्हण होती. नाही मिळाली भिक ,तर मास्तर की शिक. मंडळी मास्तर कि अशी टिंगल करण्यासारखी गोष्ट नाही. शिक्षक म्हणजे एक शिस्त,क्षमता व कर्तव्य याची जाणीव ठेवून विद्यार्थी व समाज घडविणारा घटक असतो. यातूनच भावी पिढी ,नागरिक घडविण्याची जबाबदारी असणारा गुरुजी असतो. पूर्वी आर्थिक लाभ होणारा हा व्यवसाय नव्हता .हा एक पेशा होता. आता तो व्यवसाय झाला आहे.पण ज्ञान दानाचे पवित्र कार्य करीत हे एक व्रत म्हणून स्वीकारल्या नंतर , मनुष्य जन्म मिळाल्यानंतर त्याचे कार्य सार्थक करणारा हा पेशा आहे हे सत्य आहे
शारीरिक शिक्षक म्हणून कर्तव्य पार पाडताना त्यांनी दिलेले मनोबल वाढवण्याचे धडे आत्मसात करीत अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आघाडी करून दाखविले.याचे त्यांना कौतुक वाटते.शिक्षण क्षेत्रात : प्राचार्य संतोष आमनवाड दरेगाव,
वैद्यकीय क्षेत्रात : डॉक्टर पांडुरंग ईभुतवार.रा.कोलंबी. (एमबीबीएस) वैद्यकीय अधिकारी,साहित्यक्षेत्रात : प्रा. हणमंतराव भोपाळे दरेगाव.*बँकिंग क्षेत्रात : शुभांगी बैस.कोलंबी.ही उल्लेखनीय नावे आहेत
शारीरिक शिक्षक या नात्याने शरीर सुदृढ तेचे धडे देत त्यांनी विद्यार्थाना खेळाची आवड निर्माण केली या मुळे काही विद्यार्थ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करीत पोलीस आधिकारी पदावर यश मिळवले त्यातील उल्लेखनीय कामगिरी करणारे विद्यार्थी
गिरीश तोगरवाड पी.एस.आय.
साहेबराव कसबेवाड पी.एस.आय. गोदमगाव, पोलीस : रसूल शेख कोलंबी ,पांचाळ कोलंबी, पुणेबोईनवाड सुगाव रेल्वे खात्यात : गोपाळ चव्हाण कोलंबी यांचा उल्लेख करता येईल खेळात कबड्डी : १९ वर्ष गटांमध्ये विभागीय स्तरावर निवड, कुस्ती : १९ वर्ष गटात अविनाश भद्रे या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड,लांब उडी : १७ वर्ष वयोगटात ज्योती पवार विभागीय स्तरावर निवड,शिक्षण क्षेत्रात :डी एड ,बी.एड, ग्रामसेवक , जंगल खात्यात, तलाठी ,कंडक्टर, व्यवसायिक ,इत्यादी विद्यार्थी घडवल्याचे आत्मिक समाधान जीवन शिंदे सरांना आहे.
शिंदे सर शारीरिक शिक्षक असल्याने शिस्तीचे प्रबळ वकील होते. विद्यार्थ्यांमध्ये संयम, सेवा, त्याग, व देशप्रेमाची बि पेरण्याची काम ते नेहमी करीत होते .आता त्यांनी नियतकालमानाने सेवानिवृत्तीचा काळ गाठला आहे . आज ही त्यांच्या आदरयुक्त भीतीतून शिकलेले कितीतरी विद्यार्थी यशस्वी व्यवसायिक व सरकारी नोकरी च्या पदावर नाव कमावत आहेत .आजही ते त्यांना भेटतात व सर आम्ही तुमच्यामुळे घडलो असे मनमोकळे पणाने सांगतात. एखाद्या शिक्षकासाठी यापेक्षा जास्त आत्मिक समाधान कारक गोष्ट आणखी काही असू शकत नाही अशी धारणा असून आर्थिक उन्नती पेक्षा हे आत्मिक समाधान असणारे जीवन हाच खरा सेवा परमो धर्म होय .*
शिंदे यांच्या कुंटूबाची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना सर्व घरातील व्यवहार सांभाळीत शिंदे यांनी मुलाची शिक्षणा साठी शहर गाठले, जिद्दीने मुलाला इंजिनियरिंग ला लावले त्याची फीस भरून शिक्षण पूर्ण केले. मुलीच्या शिक्षणाबाबत कुठलाच भेदभाव न करता दोन्ही मुलींचे इंजिनियर चे शिक्षण पूर्ण केले. आज त्यांचं मुलगा एका(विप्रो) नामांकित कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणून काम करतो तसेच दोन्ही मुली (इन्फोसिस) तर सुनबाई ह्या (डीलाॅइट) यासारख्या नामांकित कंपनीत काम करत आहेत पूर्ण कुटुंबीय उद्योगी क्षेत्रात प्रगती करीत स्वताच्या पायावर उभारले याचा त्यानं अभिमान वाटतो आणि जीवनाचे सार्थक झाले असे त्यांना वाटते. आई ,वडील व विद्यार्थी यांची केलेली सेवा यांचे फळ म्हणूनच आज सुखी संसाराच्या वेलीवर सुखाचे जीवन जगण्याची संधी मला मिळाली हे चित्र आज त्यांना प्राप्त झाले असे ते मानतात हे विशेष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here