• Home
  • नायगाव जनता विकास आघाडी व भाजपा शहर तर्फे मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव यांना दिवाबत्ती पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तक्रारी निवेदन देण्यात आले.

नायगाव जनता विकास आघाडी व भाजपा शहर तर्फे मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव यांना दिवाबत्ती पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तक्रारी निवेदन देण्यात आले.

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220330-WA0064.jpg

नायगाव जनता विकास आघाडी व भाजपा शहर तर्फे मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव यांना दिवाबत्ती पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तक्रारी निवेदन देण्यात आले.

 

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील ( युवा मराठा न्युज)

नायगाव जनता विकास आघाडी व भारतीय जनता पार्टी नायगाव च्या वतीने
शहरातील रस्त्यावरील स्टेट लाईट्स दिवाबत्ती कलेक्शन व नगरपंचायत चा हद्दीमधील बोर लाईट कनेक्शन
शहराला पाणीपुरवठा होणारे
जिगळा ते नायगाव व काडाळा ते नायगाव या दोनीही पाणी पुरवठा नळाचे कनेक्शन कट झाल्यामूळे त्वरीत चालु करण्यात यावे
अनेक दिवसांपासून नायगाव शहरातील शासकीय पाणीपुरवठा बंद असल्यामुळे शहरातील लोकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे येन उन्हाळ्यात पाणी पुरवठा बंद असेल तर लोकांनी पाण्यासाठी जावे कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
तसेच मुख्य अधिकारी नगरपंचायत नायगाव यांना शहरातील पाणीपुरवठा व दिवाबत्ती वसुली नोटीस महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नायगाव या कार्यालयाने कायदेशीर नोटीस
दि 22 / 2/ 22 दिली होती आणी थकित पाणी पुरवठा देयक रक्कम 66,25656
तसेच दिवा बत्ती वीज देयक रक्कम 1,57,38628 अशी रक्कम एकूण 2,23,64284 एकूण दोन कोटी 23 लाख 64 हजार 284 रुपये नगरपंचायत नायगाव हे देयक असून नायगाव शहरातील तमाम जनतेकडून दिवाबत्ती पाणीपट्टी व सामान्य पावती व मालमत्ता कर पावती आणि केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्याकडून विविध योजेने अंतर्गत शासनाचा निधी येतो या निधीचा आणि शहरातील जनते कडून केलेली वसुलीचा पैसा हा नेमका कोणाच्या खिशात
जातोय मोठा प्रश्‍न नायगाव शहरातल्या जनतेसमोर हुबा दिसत आहे
नायगाव नगरपंचायत प्रशासक आणि नायगाव नगरपंचायत सत्ताधारी यांच्या संगनमताने हा वसुलीचा पैसा यांच्या स्वतःच्या विकासासाठी वापरला असेल ते नाकारता येत नाही अशी चर्चा शहरातील तमाम शहरवासी करत आहेत
मुख्याधिकारी नगरपंचायत नायगाव यांच्याशी खडेबोल करून शहरातील तात्काळ पाणीपुरवठा आणि लाईट दिवाबत्ती तात्काळ चालू करण्यात यावी अशी लेखी स्वरूपामध्ये तक्रारी निवेदन देऊन नायगाव जनता विकास आघाडीतर्फे व भाजपा शहर यांच्यातर्फे तक्रारी अर्ज देण्यात आले काही दिवसात शहरांमध्ये पाणीपुरवठा आणि लाईट सुरळीत नाही झाले तर नाईलाजास्तव नगरपंचायत वर गाढव मोर्चा व घागर मोर्चा विविध मोर्चेबांधणी करून प्रशासनाला धडा शिकवण्यात शिवाय स्वस्त बसणार नाही
हे तक्रारीचे निवेदन देत असताना उपस्थित
देविदास पा बोमनाळे, भाऊराव पा चव्हाण
चंद्रकांत पा.चव्हाण,
माधव शंकरराव पा.कल्याण, गंगाधर पाटील कल्याण,
राजु आप्पा बेळगे,
सय्यद एजाज,
करीम चाऊस, आदम बाबा शेख, शेख बाबू सय्यद मुल्ला, राजू सोनकांबळे, शिवानंद पांचाळ, चंद्रकांत तमलुरे, जुनेद पठाण, अतुल मंगरुळे,
उपस्थित होते.

anews Banner

Leave A Comment