Home Breaking News बीड शहरातील सर्व दुकानदार,भाजीपाला, फळे विक्रेत्यांना अॅटिजेन तपासणी करण्याचे आवाहन ; जिल्हाधिकारी...

बीड शहरातील सर्व दुकानदार,भाजीपाला, फळे विक्रेत्यांना अॅटिजेन तपासणी करण्याचे आवाहन ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार – विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

99
0

बीड शहरातील सर्व दुकानदार,भाजीपाला, फळे विक्रेत्यांना अॅटिजेन तपासणी करण्याचे आवाहन ; जिल्हाधिकारी राहुल रेखावार –

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे

बीड, दि. ६ – कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात दि. 8,9 आणि 10 ऑगस्ट 2020 रोजी बीड शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदाराचे फळ- भाजी विक्रेते, दुध विक्रेते,पेट्रोल पंपावरील व बँकेमधील कर्मचारी, यांचे कोरोनाचे अॅटिजेन तपासणी (Antigart Test) तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून पुढीलप्रमाणे मोहिम राबविण्यात येणार आहे. नगर पालिकेच्या स्वच्छता निरिक्षकाव्दारे नेमलेल्या ठिकाणी तपासणीसाठी जावयाचे आहे आणि शहराबाहेरुन येणा-या दूध विक्रेत्यांची तपासणी त्यांच्या गावच्या ग्रामसेवकांनी त्यांना दिलेल्या ठिकाणीच कराण्यात येणार आहे. संघटनांच्या सदस्या व्यतिरिक्त इतर संबधित दुकानदारांनी तक्‍त्यात दिलेल्या प्रितिधींना फोन करुन आपले तपासणीसाठी दि. 7 ऑगस्ट 2020 रोजी नाव नोंदवण्याचे आवाहन, जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे, व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष असून सध्या कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी दैनंदिन सर्वेक्षण चालू आहे व त्यातुन अनेक संसर्ग झालेले रुग्ण संसर्गाचे गंभीर परिणाम होण्या आधीच रुग्णालयात दाखल करण्यात पर्यायाने होणा-या मृत्युची संख्या कमी करण्यास मदत होत आहे. परंतू सदरील संसर्ग आणखी कमी करण्यासाठी भीलवाडा पॅटर्न प्रमाणे शहरातील सुपर स्प्रेडर्स यांची तपासणी करणे आवश्यक आहे. सुपर स्प्रेडर्स म्हणजे असे व्यक्ती जे रोज मोठ्या प्रमाणावर लोकांच्या संपर्कात येत आहे. नांव नोदणीसाठी प्रतिनिधींची नावे व मोबाई क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.

संघटना/ असोशिएशन, प्रतिनिधी व मोबाईल क्रमांक ऑईल मिल संघटना, बबनराव गोरे मो. क्र. 9822534965, जालना रोड संघटना श्री. शेळके मो. क्र. 9921041111, सिध्दीविनायक कॉम्लेक्स संघटना प्रमोद सारडा 9822335218, जिल्हा मुद्रांक संघटना गणेश बलदवा 9422242351, ट्रान्स्पोर्ट संघटना गणेश शर्मा मो. क्र. 9527555567, सुभाष रोड संघटना, दिपक कर्नावट मो. क्र. 9767613161, कटलरी व स्टेशनरी संघटना, पारस तुनावत मो. क्र. 9822475030, सी.पी.डी. ए. असोशियशन, हरिओम धुप्पड, मो. क्र. 9860018808, बीड कृषी साहित्य संघटना भिमराव कोळे मो. क्र. 9422536376, जुना मोंढा व्यापारी संघटना संतोष सोहनी 7875717777, जवाहरजी कांकरिया मो. क्र. 9422931894, धोंडीपुरा रोड व्यापारी संघ, हरिओम धुप्पड, मो. क्र. 9860018808, हिरालाल चौक संघटना, शांतिलाल समदरिया मो. क्र. 9421515152, अडत व्यापारी संघटना नवा मोढां, बद्रीनारायन जाजू मो. क्र.9422242645, कारंजा रोड व्यपारी संघटना, केदार मानधने,मो. क्र. 9822527236, बीड शहर मिठाई व फरसान संघटना जितेंद्र पडझरिया,मो. क्र. 9420003388, आदर्श मार्केट साघटना, प्रकाश कानगावकर मो. क्र. 9850351816, एकता नगर व्यपारी संघटना, नगर रोड, बीड प्रकाश काळे मो.क्र. 9420655507, महात्मा फुले, नवी भाजी मंडई संघटना, भास्कर जाधव 9422743539, सराफ रोड संघटना, महेश शेटे, मो. क्र. 9823727171, रिटेल किराना असोश्सियन, विनोद ललवाणी, मो. क्र. 9822626272, सुभाष‍ रोड, पूर्व व्यपारी संघटना, भास्क्रराच गायकवाड, मो. क्र. 8087146448

वरीलपैकी दुकानाच्या प्रकारा व्यतिरिक्त इतर प्रकारच्या दुकान चालवणा-या सर्व व्यक्तीनी पुढीलप्रमाणे प्रतिनिधीशी संपर्क साधून आपली नांव नोंदणी करावी. भोसले श्रीनिवास प्रा. शा. नागापूर खु.मो. क्र.9890445710, भारती धर्मराज, प्रा. शा. गणेश नगर, मो. क्र. 9665818867, दामू रडे शाम, प्रा.शा.गगण नाथवाडी मो. क्र. 9665630031, घोरड दिनकर रेवननाथ प्रा.शा. कक्कडगांव मो. क्र. 9881653657 नोंदणी नंतर प्रत्येकाला एक स्थळ आणि वेळ कळविण्यात येणार असून बरोबर त्याचवेळी प्रतयेक दुकानदाराने तपासणीसाठी यावे. त्याच ठिकाणी एका तासातच तपासणीचा निर्णय कळविण्यात येईल. संपूर्ण प्रक्रिया ही कोठेही गर्दी न करता आणि कोविड विषयक सर्व काळजी घेऊन करण्यात येणार आहे.

या मोहिमेनंतर तपासणी झालेल्या दुकानांनाच दुकाने उघडण्याची परवानगी राहील. परंतु कोणत्याही दुकानदाराने अशी कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये व संपूर्ण सहकार्य करावे या सर्व दुकानदारांनी आपली तपासणी करुन घ्यावी. तपासणीव्दारे केवळ स्वत:लाच नाही तर आपलया परिवाराला, घरातील वृध्द व मुलांना आणि आपल्या दुकानातील कर्मचा-यांना व त्याच्या परिवाराला सुध्दा सुरक्षित ठेवता येठ्रल. बीड शहरातील कोरोना विषणूचा संसर्ग थांबविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास मदत करावी असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने बीड शहरातील सर्व प्रकारची दुकाने दि. 8,9 आणि 10 ऑगस्ट 2020 रोजी बंद राहतील याची सर्वानीं नोंद घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here