Home Breaking News देवळा तालुक्यात बिबटयांच्या धुमाकुळने नागरिकात भितीचे वातावरण  (भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा...

देवळा तालुक्यात बिबटयांच्या धुमाकुळने नागरिकात भितीचे वातावरण  (भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क

103
0

देवळा तालुक्यात बिबटयांच्या धुमाकुळने नागरिकात भितीचे वातावरण
(भिला आहेर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा:- देवळा तालुक्यातील दहिवड शिवारातील परसुल धरणालगत सांगण्या मांगण्या शिवारात लगत असलेल्या सेवानिवृत्त पोलीस आधिकारी श्री साहेबराव सोनवणे यांच्या शेतालगत असलेले श्री गोरख देवरे यांच्या शेतात बिबट्या व तीन बछडे आढळून आल्याने नागरिकांध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे श्री गोरख देवरे यांच्या शेताजवळून दहिवड येथिल शेतकरी जात असताना त्यांना बिबट्या व तीन बछडे आढळून आले असता त्यांनी तेथून पळ काढत सदर घटना उमराणे येथील जाणता राजा मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे व प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांना कळवली असता त्यांनी त्वरित वनविभागाच्या आधिकार्याशी संपर्क साधून माहिती दिली वनविभागाचे आधिकारी श्री साळुंखे. सावकार. मोरे यांनी घटनास्थळी भेट दिली असता जानता राजा मिञ मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांच्या सहकार्याने सतिश देवरे यांनी ड्रोन कॅमेराद्वारे पहाणी केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले परंतु बिबट्या व तीन बछडे आजूबाजूच्या शेतात मका व बाजरीचे पीक असल्याने बिबट्याने बछड्यांसह पलायन केले या परिसरातील मोठ्या प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यापुर्वी देखील बैल व ईतर जनावरांचा बिबट्यानी फडशा पाडला आहे यामुळे या परिसरात आणखी बिबट्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही वनविभागाने त्वरित दखल घेऊन पिंजरा लावण्यात आला आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी व दक्ष राहावे असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी जानता राजा मिञ मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे व प्रहार संघटनेचे अध्यक्ष संजय दहिवडकर. सतिश देवरे. शिवा देवरे. भुषण देवरे. रामराव देवरे. हर्षल कापडणीस. तुषार देवरे. गोरख देवरे. अदिसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here