Home जालना मराठी राजभाषा दिन संस्कार प्रबोधिनीत रंगली प्रकट मुलाखत :विद्यार्थी बनले पत्रकार

मराठी राजभाषा दिन संस्कार प्रबोधिनीत रंगली प्रकट मुलाखत :विद्यार्थी बनले पत्रकार

17
0

आशाताई बच्छाव

IMG_20240228_074325.jpg

मराठी राजभाषा दिन
संस्कार प्रबोधिनीत रंगली प्रकट मुलाखत
:विद्यार्थी बनले पत्रकार
जालना, दि. २७ (प्रतिनिधी दिलीप बोंडे) -कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मंगळवारी
जालन्यातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन
म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्कृती सातपुते,धनश्री शिंदे,
तेजश्री वाघ,साक्षी डोंगरे, कार्तिकी सरडे,वैष्णवी सोनटक्के,प्रणव
डोईफोडे, जितेश सोनटक्के या विद्यार्थ्यांनी जालन्यातील कवी डॉ.गोपाळ
विठोबा तुपकर यांची प्रकट मुलाखत घेतली.
यावेळी कवींनी स्वतःला आलेल्या अनुभवाचे थोडक्यात विवेचन करून कवितेची
महती विद्यार्थ्यांना उलगडून सांगितली.कविते संदर्भात आपल्याला काय
वाटते? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारल्यानंतर डॉ.गोपाळ तुपकर
म्हणाले. शब्दांचा संचय असला तरच तुमची कविता व्यक्त होत असते. आई आणि
भाषेची सांगड तुम्ही कशी घालतात?असे विचारले असता डॉ.तुपकर म्हणाले आई
आणि मातृभाषा ही सर्वांनाच प्रिय असते कवितेतून कवी नेहमी व्यक्त होत
असतो असे सांगून विद्यार्थ्यांनी आपला छंद विकसित केला पाहिजे म्हणजे
यशस्वी होता येते,असे सांगून त्यांनी विविध उदाहरणे देऊन यशाचा मूलमंत्र
सांगताना त्यांनी माणूस माणसाला शोधतो कुठे ही कविता सादर केली.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी एकाग्रता
महत्त्वाची आहे. एकाग्रतेतून माणूस समृद्ध होत जातो,आणि मग तो यशाला
गवसणी घालतो असे डॉ. तुपकर म्हणाले.यानंतर संस्कार प्रबोधिनी
विद्यालयातील प्रणव डोईफोडे व निकिता जाधव या विद्यार्थ्यांनी आपल्या
कविता सादर केल्या.व इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध कवयित्री
संत जनाबाईंच्या जात्या वरील ओव्या गायल्या. मराठी राजभाषा दिनाचे आयोजन
मराठीचे शिक्षक रामदास कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले
होते.

Previous articleसहकार बँक कॉलनीत आज हभप महंत बलदेवानंद महाराज गिरी यांचे किर्तन
Next articleमाझा भारत महान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here