Home गडचिरोली डॉ.रविंद्र होळी यांची आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गोंडवाना विद्यापीठाला सुवर्ण पदकासाठी...

डॉ.रविंद्र होळी यांची आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गोंडवाना विद्यापीठाला सुवर्ण पदकासाठी भरघोस देणगी

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0060.jpg

डॉ.रविंद्र होळी यांची आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गोंडवाना विद्यापीठाला सुवर्ण पदकासाठी भरघोस देणगी

रायपूर (कारवाफा) सारख्या दुर्गम भागातून होळी परिवाराचे सदस्य उच्च पदावर पोहचविण्यााठी कै.साधुजी पाटील होळी यांची मोलाची भूमिका

कै. साधुजी होळी हे आमदार डॉ देवरावजी होळी यांचे वडिल बंधू

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

डॉ.रवींद्रजी होळी , तहसीलदार, मुल यांनी गोंडवाना विद्यापीठाला सोमवारी भेट देवून आपल्या आई -वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतजी बोकारे ह्यांना १ लक्ष ५० हजार रूपयांचे २ धनादेश आ.डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते प्रदान केले.

मागास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून तहसीलदार डॉ रवींद्रजी होळी यांनी स्नातक परीक्षेत प्रथम येणाऱ्या गुणवंतांना सुवर्णपदक जाहीर करत त्यासाठीचा धनादेश आ. देवरावजी होळी यांच्या शुभ हस्ते विद्यापीठाकडे सुपूर्द केला.

गोंडवाना विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने सत्र २०२१-२२ पासुन कला स्नातक (बी. ए) या विषयात अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीला रविंद्र होळी यांच्या आई स्व. मंजुळाबाई साधुजी होळी. रु. १,५०,०००/- (एक लक्ष पन्नास हजार रु. फक्त) तसेच विज्ञान स्नातक (बि.एस्सी) या विषयात अनुसुचित जमाती (एस. टी) प्रवर्गातील गुणानुक्रमे प्रथम येणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थिनींना त्यांचे वडील स्व. साधुजी पाटील होळी या नावाने सुवर्ण पदका करिता विद्यापीठात रु. १,५०,०००/- (एक लक्ष पन्नास हजार रु. फक्त) असे एकुण रु.३,००,०००/- (तिन लक्ष रु. फक्त) असा धनादेश जमा केलेला आहे.

आमदार डॉ.देवरावजी होळी यांचे पुतणे असलेले डॉ.रविंद्रजी होळी, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून आपल्या आई वडिलांच्या कठोर परिश्रमाने आज उच्च पदावर सेवारत आहेत. त्यांच्या आई व वडिलांचा २०२२ या एकाच वर्षी झालेला मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. गरीब आदिवासी विद्यार्थांच्या शिक्षणाच्या अडचणी दूर व्हाव्यात अशी त्यांच्या आई वडिलांची नेहमीच तळमळ राहिली. आपल्या वडिलांचे ४ थ्या वर्गाचे शिक्षण आर्थिक परिस्थितीमुळे पुर्ण करू न शकल्याचे दुःख नेहमीच राहिले. त्यामुळे आपण आपल्या आई वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ सदर राशी सुवर्ण पदकासाठी देत असल्याची माहिती डॉ रविंद्रजी होळी यांनी यावेळी दिली.

या सुवर्ण पदकामुळे आपल्या आदिवासी नक्षल ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर उंचविण्यासाठी बहुमुल्य योगदान लाभेल. या क्षेत्रातील विद्यार्थांना त्यातून निश्चितच प्रोत्साहन मिळेल असे म्हणत डॉ.रविंद्रजी होळी यांनी दिलेला धनादेश कुलगुरू डॉ. प्रशांतजी बोकारे यांनी स्विकारला व होळी परिवाराचे आभार मानले .

यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, डॉ. नरेश मडावी आदी उपस्थित होते.

Previous articleयुवा नेते महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे महाराष्ट्राला नवी दिशा देणार
Next articleनगर परिषदेची बेफीकीरी उजेडात : नळातून आले मासाचे तुकडे लोकांच्या घरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here