Home गडचिरोली युवा नेते महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे महाराष्ट्राला नवी दिशा...

युवा नेते महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे महाराष्ट्राला नवी दिशा देणार

65
0

आशाताई बच्छाव

IMG-20220614-WA0053.jpg

युवा नेते महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे महाराष्ट्राला नवी दिशा देणार

शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री.अरविंदभाऊ कात्रटवार यांचे प्रतिपादन

पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य अमिर्झा येथे शेकडो माता भगिनींना वस्त्रभेट                                           गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श जोपासून शिवसेना प्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना निर्माण केली मराठी बाणा अंगिकारुण मा.बाळासाहेबानी निर्माण केलेली शिवसेना आज मोठी ताकद बनून पुढे आली आहे शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वात शिवसेनेची घोडदौड सुरु आहे मा.आदित्य साहेब ठाकरे युवा नेतृत्व म्हणुन पुढे आले आहेत त्यामुळे शिवसेनेची ताकद अधिक वाढली असून ते महाराष्ट्राला नवी दिशा देतील असे प्रतिपादन शिवसेना सह संपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य श्री.अरविंद भाऊ कात्रटवार यानी केले
राज्याचे पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्य शिवसेना सहसपंर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या पुढाकाराने आज १३ जून रोजी गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा येथे माता – भगिनींना वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
मार्गदर्शन करतांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिति सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले,शिवसेनेने तळागाळातील गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून सदैव समाजसेवेचा वसा जोपासला आहे. समाजकार्यातून मिळणारा आनंद आणि जनतेच्या समस्या सोडवून न्याय मिळवून दिल्यानंतर मिळणारे समाधान हे अमुल्य आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून अमिर्झा परिसरातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी मी सदैव कटीबध्द आहे. जनता पाठीशी राहिल्यास कोणतीही समस्या सुटू शकते आणि कार्य करतांना बळ प्राप्त होते , राज्यातील जनतेने शिवसेनेला जनसेवेची संधी दिली असून मा.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब व राज्याचे पर्यावरण मंत्री मा.आदित्य साहेब ठाकरे यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. जिल्हयाच्या विकासासाठी शासनाकडून मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात आहे. कोणतीही गोष्ट सहजासहजी साध्य होत नाही. यासाठी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा व धडपड करावी लागते तरच समस्यांची दखल घेतली जाते. माझ्या प्रयत्नामुळे केवळ दोन तीन महिन्याच्या अवधीतच अमिर्झा मौशीखांब मुरमाडी परिसरात तब्बल ३ कोटी ७१ लाखांची रस्ता दुरूस्तीचे कामे मंजूर होऊन कामांना सुरवात झाली आहे. कोणतेही काम मार्गी लावतांना जनतेचे सुध्दा सहकार्य आवश्यक आहे. अमिर्झा परिसरातील जनतेने माझ्या पाठीशी राहिल्यास या भागाचा सर्वांगीण विकास घडवून आणल्याशिवाय राहणार नाही,असे श्री. अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना शिवसेना सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे म्हणाले. गडचिरोली जिल्हा विकासात मागासलेला आहे. जिल्हयाचा विकास घडवून आणण्यासाठी मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे अनेक महत्वपुर्ण प्रकल्प मार्गी लागले आहेत.आपल्या भागाचा विकास घडवून आणायचा असेल तर जनतेने शिवसेनेच्या पाठीशी राहून आमच्या शिवसैनिकांना सेवेची संधी द्यावी, असे आवाहनही कोडाप यांनी वस्त्रभेट कार्यक्रमाप्रसंगी केले.
वस्त्रभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेनेने गोरगरीब महिला भगिंनींना वस्त्रभेट देऊन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले आहे. असे समाजसेवेचे कार्य केवळ शिवसेनाच करू शकते, असे गौरोद्गार कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या माता भगिनींनी काढले. या कार्यक्रमा प्रसंगी शिवसेना सह संपर्क प्रमुख अरविंद भाऊ कात्रटवार,सह संपर्क प्रमुख विलास कोडापे,यादवजी लोहबरे, नवनाथ ऊके,संदीप भुरसे, स्वप्निल खांडरे,राहुल सोरते,निकेस लोहबरे, अरुण बारापात्रे,संदीप अलबंनकर,सूरज उइके,नानाजी काळबान्धे,विनोद मुरतेली, दिलीप चनेकर,नागापुरे,संदीप भैसारे,अमित बानबले,अंबादास मुंनघाटे, उमेश कोलते,संजय परचाके,रोशन देशमुख, गणेश दहलाकर, किशोर देशमुख,देवेंद्र बनकर,बापूजी ढोने,उमेश गजबे,मोहन मंगर,उमाजी भैसारे यांच्या सह अमिर्झा येथील शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here