Home भंडारा पहेला येथे अपघात झालेल्या वानर (काळतोंड्याला) वन विभागाच्या रेस्क्यू टीम मुळे जीवनदान

पहेला येथे अपघात झालेल्या वानर (काळतोंड्याला) वन विभागाच्या रेस्क्यू टीम मुळे जीवनदान

206
0

आशाताई बच्छाव

IMG_20231122_165122.jpg

पहेला येथे अपघात झालेल्या वानर (काळतोंड्याला)
वन विभागाच्या रेस्क्यू टीम मुळे जीवनदान

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) आज दिनांक 22 नोव्हेंबर 2023 ला पहेला या हायवे रोड ठिकाणी एका वानर (काळतोंड्या) चा दुपारी २ वाजेच्या दरम्यान अपघात झाल्याची माहिती संजय मेहर यांनी सामाजिक कार्यकर्ते कुलदीप गंधे यांना दिली .त्यांनी लगेच पहेला येथील तलाठी रवींद्र हटवार यांच्याशी संपर्क करून त्यांनी वन विभाग पहेला येथील बीटरक्षक कृष्णा मस्के यांच्याशी संपर्क करून त्यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून तात्काळ फोन केले. क्षणाचाही विचार न करता वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा संजयजी मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव दलचे सदस्य तुकाराम डावखरे, वनरक्षक तसेच वनपाल दवडीपार यु .जी. बुंदेले, यांनी क्षणाचाही विचार न करता घटनास्थळ गाठून जखमी वानर( काळतोंड्या )यांचे रेस्क्यू फोर्सच्या टीमने पुढील उपचारासाठी भंडारा येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथे नेऊन उपचार करण्यात आले.

Previous articleअमरावती विद्यापीठात बनावट नेट-सेट प्रमाणपत्र द्वारे १९ प्राध्यापकांनी बळकवाल्या नोकऱ्या.
Next articleतरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार.. मेहुणबारे पोलीस स्टेशन ला एकावर गुन्हा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here