Home जळगाव तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार.. मेहुणबारे पोलीस स्टेशन ला एकावर गुन्हा

तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार.. मेहुणबारे पोलीस स्टेशन ला एकावर गुन्हा

172
0

आशाताई बच्छाव

IMG_20231123_054737.jpg

तरुणीला ब्लॅकमेल करून अत्याचार..
मेहुणबारे पोलीस स्टेशन ला एकावर गुन्हा

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- शेतात कामाला आलेल्या 19 वर्षीय तरुणीला 50 वर्षीय शेतमालकाने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याची घटना चाळीसगाव तालुक्यात एका गावात घडली. याप्रकरणी मेहूणबारे पोलीस ठाण्यात पीडितेच्या फिर्यादीवरून प्रौढाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित 19वर्षीय तरुणी गेल्या दोन वर्षापासून गावातीलच एका शेतमालकाच्या शेताला कामाला जात होती.2022 मध्ये पीडित तरूणीला शेतमालकाने शेतातील घरात ओढून तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कोणाकडे वाच्याता केली तर पीडितेच्या आईवडिलांना मारून टाकण्याची धमकी देत असे.
पीडितेच्या मोबाईलवरून बोलण्यासाठी बळजबरी करायचा.परिस्थिती गरीबीची असल्याने पीडितेने कुणालाच काही न सांगता अत्याचार सहन करीत राहीली.
पीडिती चाळीसगाव येथे महाविद्यालयात शिक्षणासाठी गेली असता शेतमालक तिथे पोहचला व त्याने पीडितेला एका लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरीक संबंध करत असतांनाचे व्हिडीओ व फोटो काढले.
फेब्रुवारी 2023 मध्ये पीडित तरूणीचा विवाह जुळून साखरपुडा झाल्याने पीडीतेने त्याचा मोबाईल नंबर ब्लॅक केला. त्यानंतर एकेदिवशी पीडिता कॉलेजला जात असतांनाच आरोपी शेतमालकाने तिला चाळीसगाव येथे अडवून व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देत चारचाकी वाहनाने बसवून पुन्हा लॉजेमध्ये नेऊन अत्याचार केला.
पीडितेचे मे मध्ये लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली. लग्नानंतर एक महिन्याने नराधम शेतमालकाने तिला इन्स्ट्राग्रामवर मेसेज करून भेटण्याची इच्छा व्यक्त केली.पीडितेने माझे आता लग्न झाले आहे, माझा संसार मोडू नको,मला माझे आयुष्य जगू दे अशा विनवण्या करूनही नराधम शेतमालकाने तुझ्या नवऱ्याला व्हिडीओ पाठवतो अशी धमकी दिली.
संसार मोडण्याची भीती असल्याने पीडिता नाईलाजाने त्याच्याबरोबर गेली. त्याने पुन्हा पीडितेला लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरीक संबंध ठेवले.हा प्रकार सासरी समजल्याने तिचा घटस्फोट झाला. पडितेचा तालु्नयातीलच एका गावातील मुलाशी विवाह जुळला असतांना आरोपीने लग्न जुळवणाऱ्याला पीडितेशी अनैतिक संबंध असल्याचे सांगितले.
त्यामुळे हे लग्नही मोडले.अखेर हा अत्याचार सहन न झाल्याने पीडितेने पोलीस स्टेशनला धाव घेतली.
याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला आरोपी नराधमाच्या विरोधात लेैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.

Previous articleपहेला येथे अपघात झालेल्या वानर (काळतोंड्याला) वन विभागाच्या रेस्क्यू टीम मुळे जीवनदान
Next articleसोलापुर जिल्हयातील दुध उत्पादकांच्या प्रश्नांची तातडीने सोडविण्याची मागणी 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here