Home माझं गाव माझं गा-हाणं ताहाराबाद येथे एस.टी. महामंडळाचे बेशिस्त वाहनचालक

ताहाराबाद येथे एस.टी. महामंडळाचे बेशिस्त वाहनचालक

85
0

राजेंद्र पाटील राऊत

ताहाराबाद येथे एस.टी. महामंडळाचे बेशिस्त वाहनचालक
ताहाराबाद ता. सटाणा येथे दररोज हजारो प्रवासी शासकीय एस.टी.ने प्रवास करत असतात .ताहाराबाद हे मध्यवर्ती रहदारीचे ठिकाण आहे .पुर्वेकडे मालेगाव ,पश्चिमेला आदिवासी पट्टा ,डांग जिला (गुजरात) ऊत्तरेस पिंपळनेर ,धुळे व दक्षिणेला सटाणा ,नाशिक साठी रोज ७०/८० एस.टी.बस प्रवाशांची ने आण करत असते यासाठी शासनाने भव्य असे ताहाराबाद येथे चोफुलीवर बसस्थानाक बनवले आहे तेथे प्रवाशांसाठी सुविधा निर्माण केल्या आहेत बसस्थानाकात भव्य असे फलाट बनवले आहेत तरी रोज ५/६ बसचालक ताहाराबाद बसस्थानकात बस न घालता रस्त्यावर बेजवाबदार बस ऊभि करतात यामुळे प्रवासी नागरिकांना बसमध्ये बसण्यासाठी पळापळ करावी लागते .बस रस्त्यावर ऊभि केल्याणे वहातुक खोळंबा होतो तसेच रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता निर्माण होते .सध्या एस.टी. महामंडळाचा सुरक्षा सप्ताह सुरू आहे व यातच नाशिक – नंदुरबार ,पुणे – साक्री हे वाहनचालक बेजवाबदार पणे ताहाराबाद रस्त्यावर बस दररोज ऊभ्या करतात या वाहनचालकावर कारवाई कोण करणार .का फक्त अंधळ दळतय कुत्र पिट खातय .
जेष्ठ नागरिक ,लहान मुलांना अशावेळी फार त्रास होतोय .तरीही वरिष्ठ एस.टी. महामंडळ पदाधिकाऱ्यांनी सदर चालकांना योग्य समज द्यावी अन्यथा ताहाराबाद येथिल जनता व प्रवाशी आंदोलन करूअसा इशारा दिला आहे. (जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क सटाणा ग्रामीण)

Previous articleभाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ – पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल
Next articleआता खाजगी दवाखान्यातही मिळणार २५० रूपयात कोविड लस
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here