Home मुंबई भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ – पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी...

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ – पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल

100
0

राजेंद्र पाटील राऊत

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ – पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल

राजेश एन भांगे /प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भा.ज.पा.च्या नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं हा गुन्हा दाखल केला असून, चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, किशोर वाघ यांच्याविरोधात गुन्हा झाल्यानंतर भा.ज.पा.ने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने १२ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे.
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे परळच्या महात्मा गांधी रुग्णालयात मेडिकल रेकॉर्डर म्हणून सेवेत होते.
१९९७ मध्ये तक्रारदार व्यक्तीच्या भावाचा स्पाइनल कॉडच्या शस्त्रक्रियेदरम्यान गांधी रुग्णालयात मृत्यू झाला होता.
निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला होता.
त्यामुळे तक्रारदाराने पोलिसांत धाव घेतली होती.
त्यानंतर तक्रारदाराने राष्ट्रीय ग्राहक निवारण कक्षाकडेही तक्रार केली होती.
वैद्यकीय नोंदी ठेवणारे किशोर वाघ यांनी १५ लाखांची नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारदाराच्या भावाच्या मुलाला नोकरी मिळावी म्हणून अर्ज करण्याची सूचना तक्रारादारास केली होती.
त्यासाठी वाघ यांनी चार लाखांची लाचही मागितली होती, असा आरोप तक्रारदाराने केला होता.
तशी तक्रारही त्यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती.
त्यानंतर ए.सी.बीने सापळा रचून ५ जुलै २०१६ रोजी किशोर वाघ यांना अटक करण्यात होती.

Previous articleवडगांव नगरपालिकेचे ५ कोटी ४७ लाखाचे शिलकी अंदाजपत्रक जाहीर
Next articleताहाराबाद येथे एस.टी. महामंडळाचे बेशिस्त वाहनचालक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here