Home कोल्हापूर वडगांव नगरपालिकेचे ५ कोटी ४७ लाखाचे शिलकी अंदाजपत्रक जाहीर

वडगांव नगरपालिकेचे ५ कोटी ४७ लाखाचे शिलकी अंदाजपत्रक जाहीर

155
0

 

कोल्हापूर  : हातकणंगले तालुक्यातील वडगांव नगरपालिकेचे अर्थसंकल्पीय सभा श्री महालक्ष्मी मंगलधाम येथे घेण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी होते. नगराध्यक्ष यांनी पालिकेचे ५ कोटी ४७ लाख ४७३२ रूपये अंदाजपत्रक कोणतीही करवाढ नसलेले जाहीर केले.
वडगाव नगरपालिका हद्दीतील रि.स.नं.५१८ या जागेवरती डाँ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान करावे, तसेच हातकणंगले रोड वरील पोलीस स्टेशन नजीक असणाऱ्या वसाहतीस स्व. आर. डी. पाटील सर यांचे नाव देण्यात यावे व वाणी पेठ चौक येथे डॉ.व्ही.जी. बेळे यांचे नाव , जैन बस्ती रोडला स्वर्गीय विजय वडगावे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली.
तसेच नगराध्यक्ष माळी यांनी वडगांव शहरातील सर्व नळ कन्केशनला बसवण्यात आलेल्या मिटर रिडींग प्रमाणे भाडे वसुल करण्यासाठी एजन्सी नेमणूक करण्याचा प्रस्ताव सादर केला. यावेळी नगरसेवक अजय थोरात यांनी शहरात दोन ते अडीच हजार बोगस नळ कनेक्शन आहेत याचा प्रथम शोध घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय मिटर रिडींग प्रमाणे पाणिपट्टी वसुल करू नये असे सांगितले, तसेस वेगवेगळ्या प्रश्नावर त्यांनी प्रशासनास धारेवर धरले .
भाजी मंडई मधील नविन गाळे धारकांकडून कर जमा करून का घेत नाही असा सवाल केला यावेळी प्रशासनाची तारांबळ उडाली.
नगराध्यक्ष माळी यांनी शासनाच्या नविन धोरणानुसार पालिकेची नवीन इमारत बी.ओ.टी.तत्वावर बांधाण्याचा प्रस्ताव सादर केला , यावेळी विरोधी गटाच्या नेत्या नगरसेविका सौ.विद्या पोळ यांनी या प्रस्तावाचे स्वागत केले , त्याबरोबर हे करताना कायदेशीररित्या सर्व गोष्टींची काळजी घ्यावी असे सांगितले कारण सद्याच्या भाजी मंडईचा प्रश्न समोर असल्याचे सांगितले.
यावेळी पालिकेच्या मुख्याधिकारी टिना गवळी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, सर्व नगरसेवक, नगरसेविका पालिकेचे अधिकारी यांनी सोशल डिस्टनस ठेऊन शासकिय नियमानुसार अर्थसंकल्पीय सभा घेण्यात आली.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleमौ.तडखेल वतीने शिवजयंती निमित्त शिवव्याखानाचे आयोजन
Next articleभाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ – पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here