• Home
  • आता खाजगी दवाखान्यातही मिळणार २५० रूपयात कोविड लस

आता खाजगी दवाखान्यातही मिळणार २५० रूपयात कोविड लस

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210227-WA0099.jpg

आता खाजगी दवाखान्यातही मिळणार २५० रूपयात कोविड लस

कोल्हापूर :खासगी दवाखान्यात कोविड प्रतिबंधक लसीसाठी २५० रुपये प्रतिडोस प्रमाणे शुल्क आकरले जाऊ शकते, अशी माहिती राज्याचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. ते प्रसार माध्यमासी बोलत होते. २६ फेब्रुवारी रोजी नॅशनल हेल्थ ऑथरिटीचे सी.ई.ओ. आणि केंद्रीय आरोग्य सचिवांच्या उपस्थितीत कोविन अँपवर झालेल्या व्हर्च्युअल बैठक आणि प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे निर्देश दिले.
कोविडची लस देणाऱ्या खासगी दवाखान्यात सेवाशुल्कही आकारण्यात येणार आहे. त्यानुसार, कोविडच्या लसीच्या प्रती डोसमागे प्रत्येकी १०० रुपये आकारण्यात येईल तर प्रत्येक व्यक्तीला एका डोससाठी १५० रुपये आकारले जातील.
त्यामुळे डोसची किंमत आणि त्यावरील सेवा शुल्क असे मिळून २५० रुपयांची रक्कम आकारता येऊ शकते. पुढील आदेश येईपर्यंत ही व्यवस्था कायम राहिल, असं अतिरिक्त सचिव आणि लसीकरणाच्या कार्यक्रमाचे संचालक वंदना गुरनानी यांनी सांगितले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

anews Banner

Leave A Comment