Home सामाजिक नवरा-बायकोतील नातं

नवरा-बायकोतील नातं

382
0

आशाताई बच्छाव

IMG_20240323_070049.jpg

नवरा-बायकोतील नातं

अरे संसार संसार,जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर

बहिणाबाईंच्या या ओळी किती सार्थ आहेत.आपल्याकडे लग्नाच्या पवित्र बंधनाला खूप महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे.लग्नामुळे दोन व्यक्तीच नाही तर अनेक नातेसंबंध जुळतात.नवरा-बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं.या नात्यात संशयाची ठिणगी पडली की दोघांच्याही आयुष्याची राखरांगोळी होते.नवरा-बायकोच्या नात्यात प्रथम आपुलकी, जिव्हाळा, प्रेम निर्माण होणे आवश्यक आहे.जर या गोष्टी नसतील तर नवरा -बायकोचं नातं फक्त नातंच उरतं.त्यात कुठलीही भावना नसते.दोन व्यक्ती फक्त एकमेकांसोबत शरीराने राहत असतात.असे कोरडे नाते निर्माण होऊ नये याची काळजी नवरा- बायकोने निश्चितच घेतली पाहिजे.शिवाय नव-याच्या घरातील किंवा बायकोच्या घरातील लोकांनी त्या दोघांच्या नात्यात नाक खुपसू नये.त्यामुळे दोघांमध्ये मधुर संबंध आपसूकच निर्माण होतील.
नवरा-बायकोचं नातं म्हटलं की त्यात भांडण,रूसवा- फुगवा हा आलाच.पण या गोष्टी जास्त ताणल्या जाणार नाहीत याची काळजी वेळीच दोघांनीही घेणे आवश्यक आहे.दोघांनीही एकमेकांवर अवास्तव अपेक्षा लादू नये.एकमेकांना नीट समजून घेतले तरच संसाररूपी रथ पुढे चालत राहतो.दोघांनीही एकमेकांचा सन्मान करणे खूप महत्त्वाचे आहे.ब-याच ठिकाणी नवरे मंडळी बायकोला कुठल्याही प्रकारची मदत करीत नाही.आम्ही पुरूष आहोत, आम्ही का घरातील कामे करायची? असा भ्रमाचा भोपळा अनेक नवरे आपल्यासोबत वागवत असतात.पण बायकोचाही विचार त्यांनी करायला हवा.कमीतकमी जेवढे शक्य आहे तेवढी मदत बायकोला करायला काय हरकत आहे?चुकणे हा मनुष्याचा स्वभाव आहे.संसारात दोघांकडून काही ना काही चुका होतच असतात.त्याकडे थोडे दुर्लक्ष करून छोट्या गोष्टींना लगेच संपवून टाकणे इष्ट ठरते.अन्यथा वादावादी होऊन मने खराब होतात.नवरा-बायकोच्या नात्यात काही नियमही पाळले जातात.लग्नाच्या वेळी वर -वधू एकमेकांना वचन देतात की ते आयुष्यभर एकमेकांना साथ देतील.पण आयुष्यात पुढे जाताना ब-याच नवरा-बायकोकडून हे वचन पाळले जात नाही.पण दोघांनाही त्यांच्या नात्यात प्रेम नांदावे असे वाटत असेल तर एकमेकांसाठी त्या नवरा -बायकोने असणं गरजेचं असतं.कित्येकदा नवरा बायकोला किंवा बायको नव-याला घालून पाडून बोलत असते.असे न बोलता नीट समजावून सांगणे बरोबर आहे.कित्येक घरांमध्ये नवरा-बायकोचे नाते नाममात्र असते.एकाच घरात, एकाच छताखाली राहून त्यांच्यात बोलचाल पूर्णपणे बंद असते.लोक काय म्हणतील किंवा मुले असतील तर त्यांच्यासाठी ती दोघे घटस्फोट घेत नाहीत.पण मनाने ती दोघे केव्हाच दूर गेलेली असतात.नोकरीवर जाणारी बायको असेल तर तीही संध्याकाळी दमून भागून घरी येते.अशावेळी नव-याने तिच्याकडे हे पाहिजे,ते पाहिजे असे म्हणून तिला फर्मान सोडणे बरोबर नाही.तीही एक माणूस आहे याची जाणीव तिच्या नवऱ्याने आणि घरातील इतर मंडळींनी ठेवायला हवी.नवरा-बायकोने एकमेकांना विश्वासात घेऊन आपली दु:खे, आपला त्रास,आपला आनंद एकमेकांसोबत वाटून घ्यावा.त्यामुळे त्यांच्यातील प्रेम अधिकच वृध्दींगत होते.काही नवरे आपल्या बायकोला तिच्या मित्रमैत्रिणींसोबत गप्पा करू देत नाही.पण त्याचवेळी पुरूष मात्र तासन् तास आपल्या मित्रमैत्रिणींसोबत फोनवर गप्पा, चॅटिंग करत असतात.बायको म्हणजे काही कोणी वस्तू नाही.तिलाही मन आहे, भावना आहेत . बायको गृहिणी असली तरी ती संपूर्ण घर सांभाळते.ती घरातील लोकांना काय हवं, काय नको ते बघते.ती घराकडे लक्ष ठेवते म्हणून नवरा आरामात नोकरी करू शकतो.घरातील बारीकसारीक कामे ती आनंदाने करत असते.
कित्येकदा नव-याच्या आईवडीलांशी बायकोचे विचार जुळत नाहीत.अशावेळी फक्त बायकोला दोष न देता तिला आणि आपल्या आईवडिलांना विश्वासात घेऊन योग्य मार्ग काढणे उचित ठरते.पती-पत्नीने एकमेकांना आधार देऊन,एकमेकांच्या चांगल्या -वाईट गोष्टींचा स्विकार केला तर नक्कीच त्यांचं नातं आयुष्यभर टिकेल.हे नातं टिकवण्यासाठी काही लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करावच लागतं हेही तितकेच खरे आहे.

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleनाशिकरोडला युवा मराठा महासंघाचे शिबिर संपन्न
Next articleनाशिक सिटीलिंक बसचालकांचा संप अखेर मागे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here