*नांदेड जिल्ह्यात पतीकडून पत्नी व मुलीची निर्घृणरित्या हत्या सर्वत्र खळबळ*
देगलूर,(संजय कोकेंवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)-मुखेड तालुक्यातील मंडलापूर येथे पतीने सासरवाडीला येऊन पत्नी व एक वर्षाच्या मुलाची गळ्यावर चाकूने वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना काल बुधवारी दि.२७ रोजी सकाळी घडली.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की,तानाजी भुताळे वय ३० रा.येडूर ता,देगलूर जि.नांदेड हा मंडलापूर येथे सासरवाडीला आला असता त्याच्या पत्नीस गावी येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला.काल बुधवारी दारुच्या नशेत मुखेड-देगलूर रस्त्यावर असलेल्या मंडलापूर येथे शिवारात पत्नीच्या राहत्या घरी रागात येऊन पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची चाकूने गळ्यावर वार करुन क्रुररित्या हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले .
तर याबाबत आधिक तपास पोलिस करत आहेत.आरोपी पळून जात असताना गावातील नागरिकांनी त्यास पकडून झाडाला बांधून ठेवले व पोलिसांना माहिती दिली.घटना कळताच पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगर हे घटनास्थळी दाखल झाले सदर घटना कळताच आजूबाजुच्या गावातील नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती.
मयत वैशाली तानाजी भुताळे वय २५ आणि आदेश तानाजी भुताळे वय १ यांच्या हत्येने संपूर्ण तालुका हादरला असून पोलिसांनी आरोपी तानाजी भुताळे यास अटक केली आहे.
