• Home
  • २५ डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये भीषण आग

२५ डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये भीषण आग

 

  • 🛑 २५ डॉक्टरांना ठेवण्यात आलेल्या मुंबईतील फॉर्च्युन हॉटेलमध्ये भीषण आग 🛑
    मुंबई 🙁 विजय पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, २८ मे :- धोबी तलाव परिसरात असलेल्या हॉटेल फॉर्च्युनमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या हॉटेलमध्ये जवळपास २५ डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. हॉटेलच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्याला आग लागल्यामुळे परिसरात धुराचे लोट उडाले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार २५ निवासी डॉक्टरांचा जीव वाचवण्यात यश मिळालं आहे. ही आग नेमकी कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. या प्रकरणाच्या चौकशीनंतर कारण समजू शकेल.

काही डॉक्टर्स चौथ्या तर काही टेरेसवर अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ जवानांनी शिडीच्या मदतीनं या सर्व डॉक्टरांना सुखरुप वाचवलं आहे. सध्या या सर्व डॉक्टरांची राहण्याची व्यवस्था ट्रायडंट हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. दरम्यान स्थानिक लोकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाला २५ डॉक्टरांचे प्राण वाचवण्यात मोठं यश आलं आहे.

anews Banner

Leave A Comment