• Home
  • करोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ करोनामुक्त

करोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ करोनामुक्त

⭕करोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ करोनामुक्त⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे शहरात गेल्या २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूमुखींची संख्या वाढताना दिसत असली तरी बुधवारी शहर जिल्ह्यातील करोनाच्या संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. शहर जिल्ह्यात करोनाचे १६३ नवे रुग्ण आढळले असून समाधानाची दुसरी बाब म्हणजे १८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान, १७१ रुग्णांची प्रकृती गंभीर असून मृतांच्या संख्येने तीनशेचा आकडा गाठला आहे.

राज्यात पुणे व मुंबई या शहरांसह अन्य जिल्ह्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढला असला तरी महिन्यापूर्वी रुग्ण दुप्पटीचा होणारा वेग आता चक्क १४.७ दिवसांवर येऊन ठेपला असल्याची समाधानाची बाब आरोग्य खात्याच्या अभ्यासातून समोर आली आहे. त्याशिवाय राज्यात आजमिताला ५६ हजार ९४८ जणांना लागण झाली असली तरी त्यांपैकी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे ३१.५ टक्क्यांवर असल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

रोहित पवार यांनी दिला रुग्णांना धीर

कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी पुणे येथील ससून हॉस्पिटलला आज भेट देत तेथील रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांना अतिदक्षता विभागात जाण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्यांनी आवर्जुन तिथे जाऊन जे गंभीर रुग्ण आहेत त्यांची व करोनाशी लढा देत असताना संक्रमित झालेल्या डॉक्टर, नर्स, सुरक्षारक्षक आदींची भेट घेतली. ‘काळजी घ्या’ असा आपुलकीचा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना भेटून त्यांच्या अडचणी व तेथील परिस्थितीही त्यांनी जाणून घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्याबरोबरच पुणे येथील हॉस्पिटलवरही बारकाईने लक्ष आहे. करोना वॉरियर्सना लागणारी मदतही ते पोहोचवत आहेत, असे रोहित पवार यावेळी म्हणाले. मानदेशी फाऊंडेशनच्या वतीने ससून हॉस्पिटलसाठी पीपीई किट, गॉगल व एन-९५ मास्क रोहित पवार यांचेकडे देण्यात आले होते. हे सर्व साहित्य ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे त्यांनी सुपूर्द केले.

anews Banner

Leave A Comment