⭕उरळीकांचन तळवाडी चौकात रात्रीच्या वेळेस पोलिसाला मारहाण ⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
हडपसर : उरळीकांचन तळवाडी चौकात रात्रीच्या वेळेस किरकोळ कारणावरून एका तरुणाला काही जण मारहाण करीत असल्याचे पाहून तेथून जाणाऱ्या ग्रामीण पोलिसाने भांडणे सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामध्ये भांडणे सोडवणाऱ्या पोलिसालाच टोळक्याने मारहाण केली. या घटनेत सोमनाथ चितारे (रा. उरुळी कांचन, पुणे) या पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण झाली. या प्रकरणी शुभम उर्फ दाद्या अशोक कानकाटे (रा. इनामदार वस्ती, कोरेगाव), अजय ठवरे (रा. उरुळी कांचन, पुणे) यांच्यासह आठ अज्ञात व्यक्तींवर फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
