• Home
  • पुणे: लॉकडाउनचा ‘तो’ व्हायरल मेसेज बोगस

पुणे: लॉकडाउनचा ‘तो’ व्हायरल मेसेज बोगस

⭕ पुणे: लॉकडाउनचा ‘तो’ व्हायरल मेसेज बोगस !⭕
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :- चौथ्या लॉकडाउननंतर पुन्हा एकदा कडक लॉकडाउन होणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक नागरिक आवश्यक त्या वस्तूंचा साठा करत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर फिरणारा हा मेसेज चुकीचा असून शहरात मुबलक प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचा साठा असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती काळजी घेतली गेल्याने गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील २१ ठिकाणी रुग्णसंख्या कमी झाली आहे. परंतु, नॉन कंटेन्मेंट झोनमध्ये खरेदीच्या निमित्ताने नागरिक बाहेर पडत असल्याने अशा ठिकाणी नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे नारिकांनी स्वतः योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ व्यंकटेशम यांनी केले.

चौथ्या लॉकडाउनमध्ये नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. त्यामुळे अनेक नागरिक बिनधास्तपणे घराबाहेर पडत आहेत. जिल्हा, तसेच पोलिस प्रशासनाने बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी कारोनाबाधितांची संख्या वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी या लॉकडाउननंतर कडक निर्बंध लादण्यात येणार असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हा मेसेज खोटा असून नागरिकांनी त्यावर विश्वास ठेऊ नये, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

‘विमानतळावरून घरी जाण्यासाठी सॅनिटाइज्ड वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. प्रवाशांचा बोर्डिंग पास हाच वाहतुकीचा पास असणार आहे. तुम्ही एखादे वाहन विमानतळावर स्वतःला नेण्यासाठी बोलविणार असाल, तर बोर्डिंग पासचा फोटो संबंधित वाहनचालकाला व्हॉट्सअॅपवरून पाठवून तुम्ही इच्छित स्थळी जाऊ शकता,’ असेही आयुक्तांनी सांगितले.

‘लष्कराला आदेश नाहीत’
करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुणे अथवा मुंबईत लष्कर तैनात केले जाणार आहे, या वृत्तामध्ये तथ्य नाही. आजपर्यंत लष्कराला असे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. लष्करानेही असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. या संदर्भात फिरणारे मेसेज अधिकृत नाहीत. नागरिकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असे लष्करातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.

anews Banner

Leave A Comment