Home पुणे पटेल रुग्णालयात ‘हेल्थ एटीएम’

पटेल रुग्णालयात ‘हेल्थ एटीएम’

226

⭕पटेल रुग्णालयात ‘हेल्थ एटीएम’
पुणे 🙁 विलास पवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे :- एकाच वेळी तब्बल २३ आरोग्य तपासण्या करणाऱ्या ‘हेल्थ एटीएम’ सुविधेचा लाभ आता पुणे कँटोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयातील रुग्णांना घेता येणार आहे. विधान परिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी आमदार निधीतून ‘हेल्थ एटीएम’ रुग्णालयाला उपलब्ध करून दिले आहे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीने या एटीएमची निर्मिती केली असून, त्याद्वारे रक्तदाब, मधुमेहाचे प्रमाण, हृदयाचे ठोके मोजणाऱ्या २३ आरोग्य तपासण्या अवघ्या पाच मिनिटांत करता येणार आत. त्यामुळे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रुग्णाची रोगप्रतिकार शक्ती आणि गंभीर आजाराचे निदान वेळेवर करणे शक्य होणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाभाऊ चव्हाण यांच्या हस्ते हे एटीएम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार आणि रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. या वेळी आकाश चव्हाण, मोहन नारायणे, संदीप भोसले, राजेंद्र म्हस्के पाटील, जसपाल सिंग आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleपुणे: लॉकडाउनचा ‘तो’ व्हायरल मेसेज बोगस
Next articleसमाधानकारक” नांदेडात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला उतरती कळा, आज पुन्हा 7 रुग्णांना सुट्टी, आतापर्यंत 86 बरे होऊन घरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.