Home नांदेड समाधानकारक” नांदेडात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला उतरती कळा, आज पुन्हा 7 रुग्णांना...

समाधानकारक” नांदेडात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला उतरती कळा, आज पुन्हा 7 रुग्णांना सुट्टी, आतापर्यंत 86 बरे होऊन घरी

139
0

*समाधानकारक” नांदेडात वाढत्या कोरोना रुग्ण संख्येला उतरती कळा, आज पुन्हा 7 रुग्णांना सुट्टी, आतापर्यंत 86 बरे होऊन घरी*
*नांदेड दि. २७ ; राजेश एन भांगे*
कोरोना विषाणु संदर्भात बुधवार 27 मे 2020 रोजी सायंकाळी 5 वा. पुढीलप्रमाणे माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. आज प्राप्त झालेल्या एकूण 149 अहवालापैकी 144 निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाले असून आज एकही नवीन रुग्ण पॉझीटीव्ह आढळला नाही. आजपर्यत नांदेड जिल्हयातील कोराना रुग्णांची एकूण संख्या 137 एवढी आहे.

बुधवार 27 मे रोजी एनआरआय भवन व यात्री निवास कोविड सेंटर येथील 7 रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. आतापर्यंत 137 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 86 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे तर उर्वरीत 44 रुग्णांवर औषधोपचार सुरु असून त्यातील दोन महिला (वय-52 व 55 वर्षे )रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे.

बुधवार 27 मे रोजी कोरोना संशयीत व कोविड रुग्णांची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 36 हजार 132, घेतलेले स्वॅब 3 हजार 502, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 85, आज रोजी पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- निरंक, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 137, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 140, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 14, मृत्यू संख्या 7, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 86, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 44, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 122 एवढी आहे.

काल मंगळवार 26 मे रोजी पाठविण्यात आलेल्या 122 स्वॅब तपासणी अहवाल रात्री उशिरा पर्यंत प्राप्त होतील. तर बुधवार 27 मे रोजी 42 रुग्णांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळीपर्यंत प्राप्त होतील.

एकुण 137 रुग्णांपैकी 7 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 86 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 44 रुग्णांपैकी 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड. पंजाब भवन कोवीड केअर सेंटर, यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे 21 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 5, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय बिलोली येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय माहूर येथे 1 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय गोंकुदा येथे 1 रुग्ण व ग्रामीण रुग्णालय उमरी येथे 4 रुग्ण असून 2 रुग्ण मुंबई येथे संदर्भित करण्यात आले आहे. सर्व रुग्णांवर औषध उपचार सुरु असून त्यांची प्रकृती सद्य:स्थितीत स्थिर आहे.

जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करण्यास मदत करते, असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

नांदेड जिल्हा : कोरोना विषाणू संसर्गाबाबत बुधवार 27 मे रोजी सायं. 5 वाजेपर्यंतची आकडेवारी

• आत्तापर्यंत एकूण संशयित – 3 हजार 511,• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-3 हजार 197,• क्वारंटाईन कालावधी पूर्ण – 1 हजार 682,• अजून निरीक्षणाखाली असलेले – 221,• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये – 45• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -3 हजार 152,• आज घेतलेले नमुने – 42,• एकुण नमुने तपासणी- 3 हजार 502,• एकुण पॉझिटीव्ह रुग्ण- 137,• पैकी निगेटीव्ह – 3 हजार 85,• नमुने तपासणी अहवाल बाकी- 122,• नाकारण्यात आलेले नमुने – 14,• अनिर्णित अहवाल – 140,• कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले – 86,• कोरोना बाधित रुग्णांची मृत्यू संख्या – 7,• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी 1 लाख 36 हजार 132 जणांना घरी राहण्याचा सल्ला दिलेला आहे तसेच त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले आहेत, अशी माहिती नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.

Previous articleपटेल रुग्णालयात ‘हेल्थ एटीएम’
Next articleराज्यातील संपूर्ण कापूस खरेदी १५ जूनपर्यंत करण्याच्या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सूचना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here