Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर येथे झावळयाचा रविवार उत्साहात साजरा

श्रीरामपूर येथे झावळयाचा रविवार उत्साहात साजरा

103
0

आशाताई बच्छाव

IMG_20240324_170535.jpg

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी –आज रविवार दिनांक २४/३/२०२४
आज झावळ्याचा रविवार.
आज लोयोला सदन चर्च श्रीरामपूर येथे झावळ्याच्या रविवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.त्याप्रसंगी रे.फा.ज्यो गायकवाड यांनी झावळ्याना आशिर्वाद देवून प्रार्थना केली व झावळ्याची मिरवणूक मदर तेरेसा चौक ते पुन्हा लोयोला सदन अशी मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी लहान मूले मुली, संत कनोसा होस्टेल येथील सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होत्या त्याचबरोबर महिला मंडळ , पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.तसेच श्रीरामपूर धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे.फा.ज्यो गायकवाड व संत झेवियर स्कूलचे प्राचार्य रे.फा.टायटस,रे.फा.अनिल चक्रनारायण ,रे.फा.संपत भोसले यांच्या उपस्थितीत मिरवणूक व पवित्र मिस्सा अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आपल्याला सांगतो की ,”आता मनुष्याच्या पूत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.”
प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना अनंतकाळचे जीवन देण्यासाठी, त्याचे दुःख व जीवन अर्पण केले. आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्याच्या जीवनावरच्या मार्गावर बलवान होण्यासाठी आमंत्रित करीत आहे. तो जेथे आहे तेथे आपण असावे अशी त्याची इच्छा आहे.
हे प्रभू येशू ख्रिस्ता तू खरोखर ह्या विश्वाचा राजा आहेस. तुझ्या ह्या वैभवात आम्ही सर्वांनी सहभागी होण्यास आम्ही पात्र व्हावे. म्हणून आम्हास कृपा ,शक्ती व सामर्थ्य दे.
याप्रसंगी संत लूकच्या सर्व सिस्टरर्स, कानोसा होस्टेलच्या सर्व सिस्टरर्स, सेवक प्रतिनिधी,लोयोला महिला मंडळ, विजय त्रिभुवन, कमलाकर पंडीत, उत्तमराव गायकवाड,सुवर्णा बोधक, निर्मला अमोलिक, राजू साळवे, सूरेश ठुबे, रविंद्र लोंढे, ललित गायकवाड,लाजरस गायकवाड, संदिप साळवे, फ़्रान्सिस शेळके,लेविन भोसले, लता बनसोडे, पुष्पा कोळगे यांच्यासह अनेक भाविकांची उपस्थिती होती. सर्वांनी या पवित्र आठवड्यात प्रायश्चित करून स्वतःचे परिवर्तन करून घ्यावे. अशी परमेश्वर पित्याची इच्छा आहे.

Previous articleआयोध्या येथील नागा गोपालदास महाराजांचे श्रीरामपूर नगरीत भव्य स्वागत
Next articleशांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराला सुरुवात
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here