Home उतर महाराष्ट्र आयोध्या येथील नागा गोपालदास महाराजांचे श्रीरामपूर नगरीत भव्य स्वागत

आयोध्या येथील नागा गोपालदास महाराजांचे श्रीरामपूर नगरीत भव्य स्वागत

69
0

आशाताई बच्छाव

IMG_20240324_165941.jpg

आयोध्या येथील नागा गोपालदास महाराजांचे श्रीरामपूर नगरीत भव्य स्वागत

श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी– श्रीराम भूमी आयोध्या येथे सेवेत असलेले अखिल भारतीय श्री पंच रामानंदीय दिगंबर आखाड्याचे नागा गोपालदास महाराज यांचे संत नागेबाबा मल्टी स्टेट पतसंस्थेच्या कार्यालयात आरोग्य मित्र सुभाष दादा गायकवाड यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, जिल्हाध्यक्ष दीपक कदम, यशस्वी फाउंडेशनचे अध्यक्ष व स्वच्छता दूत म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेले आदित्यजी घाटगे, प्रथीतयश व्यापारी विलासराव शेटे, हिंद सेवा मंडळ कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन आदीक जोशी, व्यापारी ज्ञानेश सारंगधर, निशिकांत पंडित, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अडीचशे पुरस्कार प्राप्त आरोग्य मित्र सुभाष दादा गायकवाड यांच्या आरोग्य क्षेत्रातील कामा संदर्भात नागा गोपालदास महाराज यांचा संपर्क आला त्यांच्याकडून रुग्णाला झालेल्या मदतीची भावना ठेवून महाराज त्यांच्या भेटीसाठी श्रीरामपूर येथे आले असता अयोध्यातील प्रभू श्रीराम मंदिराच्या झालेल्या प्रांण प्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात माहिती देऊन सर्व धर्मीयांनी आपापसातील मतभेद विचारभेद बाजूला ठेवून एकसंघ राहावे अशी भावना व्यक्त केली पतसंस्थेचे चेअरमन कडू भाऊ काळे यांच्याशीही महाराजांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांना व उपस्थित मान्यवरांना आयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले तर आज खरोखर महाराजांचे दर्शन झाले याचा आनंद तर झालाच परंतु आम्ही आयोध्यातच असल्याची जाणीव झाल्याची भावना सुभाष दादा गायकवाड यांनी व्यक्त केली

Previous articleचांदूरबाजारात प्रविण तोगडीयांची धावती भेट
Next articleश्रीरामपूर येथे झावळयाचा रविवार उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here