• Home
  • तुमचं आरोग्य सेतू अ‍ॅप होतेय हॅक

तुमचं आरोग्य सेतू अ‍ॅप होतेय हॅक

🛑 तुमचं आरोग्य सेतू अ‍ॅप होतेय हॅक ? 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 11 जून : ⭕ केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संक्रमणास नियंत्रित करण्यासाठी नागरिकांना आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. या आवहनाला भरघोस प्रतिसाद देत असंख्य नागरीकांनी हा अ‍ॅप डाऊनलोड केला होता. मात्र आता याच अ‍ॅप सारखा आणखीन एक फेक अ‍ॅप बाजारात आला आहे. त्यामुळे तुम्ही जर हा अ‍ॅप डाऊनलोड केला असेल तर त्वरित तुमचा अ‍ॅप फेक तर नांही ना ? हे आताच चेक करून घ्या.

कोरोना विरोधात एकीकडे अख्ख जग लढत असताना पाकिस्तानला हेरगिरी करण्याचे सुचले आहे. त्यानुसार पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने हुबेहुब बनावट आरोग्य सेतू अ‍ॅप बनवले आहे. जो कोणी हे बनावट अॅप डाउनलोड केले, तर त्याच्या फोनची सर्व माहिती पाकिस्तानच्या हॅकर्सना उपलब्ध होते. हे अ‍ॅप आता बाजारात आले असून नागरीक याला डाऊनलोड करू लागले आहेत. या फेक अ‍ॅपद्वारे पाकिस्तान आयएसआयच्या मदतीने हॅकर्स भारतीय ब्यूरोक्रेसी आणि डिफेंसशी निगडीत संस्थांची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात सध्या महाराष्ट्र सायबर सेल चौकशी करत आहे.

जर तुम्ही आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केले असेल तर ते अ‍ॅप फेक तर नाही ना? याचा तपास करून घ्या. खालील दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला हे फेक अ‍ॅप ओळखता येणार आहे.

असे ओळखा फेक अ‍ॅप :-

➡️ अ‍ॅप हे प्लेस्टोअर किंवा iOS वरूनच डाउनलोड करा.
➡️ कोणत्याही अन व्हेरीफायड स्त्रोतावरून किंवा दुव्यावरून आरोग्य सेतू अ‍ॅप डाउनलोड करू नका.
➡️ बनावट अ‍ॅपचे एक्सटेंशन फाइल नाव .apk आहे, तर आरोग्य सेतू अ‍ॅचे एक्सटेंशन फाइल नाव gov.in आहे.
➡️ आपणास जर का कोणी बनावट लिंक पाठवत असेल, तर सायबर सेलला त्वरित कळवा.⭕

anews Banner

Leave A Comment