🛑 13 आणि 14 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )
मुंबई, 11 जून : ⭕ 13 आणि 14 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. अरबी समुद्रात मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने सुरु असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली. आजही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे.⭕
