Home Breaking News मुंबईतील ऐतिहासिक क्रॉफर्ड मार्केटला आग

मुंबईतील ऐतिहासिक क्रॉफर्ड मार्केटला आग

99
0

🛑 मुंबईतील ऐतिहासिक क्रॉफर्ड मार्केटला आग 🛑
मुंबई ( साईप्रजित मोरे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

मुंबई, 11 जून : ⭕ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दक्षिण मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात भीषण आग लागली. आगीचं कारण अद्यापही असप्ष्ट आहे. सध्याच्या घडीला आगीचं स्वरुप आणि धुराचे प्रचंड लोट पाहता ही आग मार्केट इमारतीच्या बहुतांश भागात पसरल्याचं कळत आहे. आगीचं हे स्वरुप पाहता अग्निशमन दलाच्या जवळपास ८- १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार सायंकाळच्या सुमारास ही आग लागल्याचं कळलं. त्याचवेळी तातडीनं अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. असं असलं तरीही आग इतक्या भीषण स्वरुपानं पसरत गेली की आगीच्या विळख्यात मार्केटमधील अनेक दुकानं आल्याचं म्हटलं जात आहे. मार्केटमध्ये असणाऱ्या चार गाळ्यांना ही आग लागली ज्यानंतर ती वेगानं परसरल्याचं म्हटलं जात आहे. ही आग लेवल 2 म्हणजेच मध्यम स्वरुपाची असल्टी माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून, त्यांना बऱ्याच अंशी यशही मिळालं आहे. या आगीत सौंदर्य प्रसाधनं आणि स्टेशनरी साहित्याच्या पाच ते सहा दुकानांचं मोठं नुकसान झालं आहे. मुंबईतील गजबजलेल्या परिसरात असणाऱ्या या मार्केट परिसरात गुरुवारी तुलनेने गर्दी कमी होती. कोरोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लकडाऊनच्या काळानंतर सुरु झालेल्या अनलॉकमध्ये हे ठिकाण पूर्वपदावर येत होतं. पण, आग लागल्याच्या घटनेनं त्या ठिकाणी एकच गोंधळ आणि भीती पाहायला मिळाली. ⭕

Previous article13 आणि 14 जून रोजी मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
Next articleनांदेड जिल्हा पुन्हा हदरले”
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here