Home भंडारा शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराला...

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराला सुरुवात

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240324_170918.jpg

शांतीवन बुद्ध विहार पाथरी (चिचाळ) येथे ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराला सुरुवात

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी( चिचाळ )येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ सेंटर भंडारा धम्म वर्ग पवनी यांच्या विद्यमाने ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबिराला 22 मार्च 2024 पासून सुरुवात करण्यात आलेले असून 26 मार्च 2024 सकाळी नऊ वाजेपर्यंत हे ध्यानसाधना शिबिर चालणार आहे .या धम्म शिबिरात एकूण 50 बौद्ध उपासक उपासिका यांनी सहभाग नोंदविला आहे. या धम्म शिबिराला धम्मचारीणी सुमेधा नागपूर ,धम्मचारीनणी ज्ञान सखी ,धम्मचारी विमरत्न नागपूर, धम्मचारी विमल रत्न नागपूर मार्गदर्शन करीत आहेत. या धम्म शिबिरात पूजा वंदना, आनापानसती ,मैत्री भावना ,ध्यान सराव ,धम्म अभ्यास ,धम्म प्रवचन ,संपर्क सराव , चलीत ज्ञान सराव इत्यादी गोष्टी प्रत्यक्षरीत्या शिकवल्या जातात. ध्यान साधना व व्यक्तिमत्व विकास धम्म शिबीर यशस्वी करण्याकरता झिबल कावळे ,तारका घोडके ,अर्चना अंबादे ,हर्षबाला शहारे ,नलिनी जांभुळकर, धम्ममित्र ज्ञानेश्वर चव्हाण ,देवेंद्र अंबादे, देवानंद सहारे ,मुकुंद गेडाम, नाना जाधव ,ज्योती चव्हाण, कांता कोचे ,इंदिरा रामटेके, नीता राऊत ,जोशीला अलोने ,प्रतिमा शहारे, विनिता रामटेके सहकार्य करीत आहेत. या धम्म शिबिरात राहण्याची व जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ध्यानसाधना व व्यक्तिमत्व विकास शिबिराकरिता शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवनबोधी बौद्ध यांनी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या शिबिराला प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी २३मार्च भेट देऊन सुरू असलेल्या धम् शिबिरा बाबत समाधान व्यक्त केले.

Previous articleश्रीरामपूर येथे झावळयाचा रविवार उत्साहात साजरा
Next articleअखेर सत्याचा विजय आदिवासी समाजाच्या बाजूने -डॉ. सुरेशकुमार पंधरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here